बॉलिवूडची या प्रसिद्ध अभिनेत्रीचे 11 वर्षांचं नातं संपुष्टात, सोशल मीडियावर पतीपासून वेगळं झाल्याचे केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 11:47 IST2019-08-01T11:44:54+5:302019-08-01T11:47:53+5:30

बॉलिवूडमधल्या एक प्रसिद्ध अभिनेत्रीने ट्वीटरच्या माध्यमातून आपण पतीपासून विभक्त झाल्याचे सांगितले आहे.  दिया आणि साहिलने परस्पर सहमतीने

Dia mirza separated from husband sahil sangha | बॉलिवूडची या प्रसिद्ध अभिनेत्रीचे 11 वर्षांचं नातं संपुष्टात, सोशल मीडियावर पतीपासून वेगळं झाल्याचे केले जाहीर

बॉलिवूडची या प्रसिद्ध अभिनेत्रीचे 11 वर्षांचं नातं संपुष्टात, सोशल मीडियावर पतीपासून वेगळं झाल्याचे केले जाहीर

बॉलिवूडमध्ये रोज ब्रेकअप आणि पॅचअप होणं काही नवी गोष्ट नाही. बॉलिवूडमधल्या एक प्रसिद्ध अभिनेत्रीने ट्वीटरच्या माध्यमातून आपण पतीपासून विभक्त झाल्याचे सांगितले आहे.  रहेना है तेरे दिल में मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आम्ही बोलतोय, दिया मिर्झाबदल.  दियाचे 2014 मध्ये साहिल संघासोबत लग्न केले होते. अनेक वर्ष नात्यामध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले होते.  दिया आणि साहिलने परस्पर सहमतीने हा निर्णय घेतल्याचे तिने ट्विटरवर सांगितले आहे.



 

दियाने या सोबत एक नोट देखील लिहिली आहे. या नोटमध्ये दियाने कुटुंबीयांचे आणि मित्रपरिवारचे आभार मानले आहेत तसेच प्रसार माध्यमांना ही त्याच्या निर्णयाचा रिस्पेक्ट करावा अशी विनंती तिने केली आहे. साहिल हा दियाचा बिझनेस पार्टनर होतो. अनेक सार्वजनिक ठिकाणी दोघे एकत्र फिरायचे. दियाच्या या ट्वीटमुळे तिच्या फॅन्सना नक्कीच धक्का बसलेला असेल यात काही शंका नाही. 

 
 दियाने 2000 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब मिळवला. त्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली. मिस एशिया पॅसिफिक बनल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

'रहेना है तेरे दिल में' नंतर तो तुमको ना भूल पायेंगे, दम, दस, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. संजू या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने मान्यता दत्तची भूमिका साकारली होती. तिने बॉबी जासूस या चित्रपटाची देखील निर्मिती केली आहे. 

Web Title: Dia mirza separated from husband sahil sangha