साहिल सांघासोबत घटस्फोट झालेल्यानंतर दिया मिर्झाच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, बिझनेसमनला करतेय डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 18:47 IST2020-09-08T18:41:01+5:302020-09-08T18:47:24+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे.

साहिल सांघासोबत घटस्फोट झालेल्यानंतर दिया मिर्झाच्या आयुष्यात आलं नवं प्रेम, बिझनेसमनला करतेय डेट
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे. दिया सध्या आपल्या खास व्यक्तीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. स्पॉटब्वॉयच्या रिपोर्टनुसार दिया पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. बिझनेसमन वैभव रेखीला ती डेट करते आहे. वैभव रेखी याआधी योग गुरु सुनैना रेखीसोबत होते, मात्र त्यानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला. दोघांनी एक मुलगी देखील आहे.
अशी सुरु झाली लव्हस्टोरी
दियाने वैभवला ट्विटरवर फॉलो करायला सुरुवात केली. लॉकडाऊन दरम्यान दोघे रिलेशनशीपमध्ये आले. रिपोर्टनुसार सध्या दिया वैभवसोबत त्याच्या पाली हिल इथल्या घरात टाईम स्पेंट करते आहे.
दियाचा साहिल सांघासोबत घटस्फोट
2019मध्ये दियाचा साहिल सांघासोबत घटस्फोट झाला. दिया आणि साहिल संघा हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. त्या दोघांची पहिली ओळख 2009 मध्ये झाली होती. एका सिनेमाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली होती. साहिल एका चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन दियाच्या घरी गेला होता. . ब्रुकलेन ब्रिजवर साहिलने दियाला प्रपोज केले होते. दीया मिर्झा आणि साहिल सांगा अनेक वर्ष नात्यामध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. दिया मिर्झाने लग्नाच्या पाच वर्षानंतर नवरा साहिल सांगासोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.