'धुरंधर' चित्रपट हा 'सत्या'ची कॉपी? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:25 IST2026-02-26T13:42:10+5:302026-02-26T15:25:08+5:30
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये 'सत्या' आणि 'धुरंधर' या दोन्ही चित्रपटांतील अनेक दृश्यांत साधर्म्य असल्याचे दाखवले आहे.

'धुरंधर' चित्रपट हा 'सत्या'ची कॉपी? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते थक्क!
Dhurandhar Vs Satya : सध्या बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे, तो म्हणजे 'धुरंधर'. अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेता अक्षय खन्ना स्टारर या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 'धुरंधर'ची तुलना १९९८ मधील गँगस्टर क्लासिक 'सत्या' चित्रपटाशी करण्यात येत आहे. या दोन्ही चित्रपटांतील साम्य पाहून चाहतेही थक्क झालेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये 'धुरंधर' आणि 'सत्या' मधील ८ ते १० अशा क्लिप्स आहेत, ज्या फ्रेम-टू-फ्रेम सारख्या दिसतात. नेटकऱ्यांनी या दोन्ही चित्रपटांतील खालील साम्य शोधून काढले आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एका युजरनं लिहिले, "राम गोपाल वर्मा धुरंधरची स्तुती करत आहेत, पण हा त्यांच्याच 'सत्या'पासून प्रेरित आहे, हे ते विसरले असावेत". तर दुसऱ्याने मजेशीर टोला लगावत म्हटले की, "आजकाल प्रत्येक गँगस्टर चित्रपट याच कथानकावर आधारित असतो".
Don't know about the deep research for #Dhurandhar by @AdityaDharFilms ... But one thing is for sure, that he seems to be a big fan of the movie #Satya.
— Unbigoted Rizvi (@unbigotedrizvi) February 23, 2026
No Offense.... I myself loved watching #Dhurandhar... But for across this awesome video. pic.twitter.com/ciUfmHzcUB
सिक्वेलची प्रतीक्षा!
'धुरंधर'ची क्रेझ कायम असतानाच, आता या चित्रपटाचा सिक्वेल 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhudar: The Revenge) येत्या १९ मार्च रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसऱ्या भागात काय नवीन पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहते व्यक्त करत आहेत.
'सत्या' अत्यंत गाजलेला चित्रपट
राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्या'मधून अंडरवर्ल्डचे जग पडद्यावर वास्तववादी पद्धतीने मांडले होते. जेडी चक्रवर्तीने सत्या तर मनोज वाजपेयी यांनी भीकू म्हात्रेची भूमिका साकारली होती. १९९८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं आणि 6 फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.