'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! रणवीर सिंहच्या सिनेमानं १९ दिवसांमध्ये किती कोटी कमावले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:40 IST2026-04-07T12:38:50+5:302026-04-07T12:40:11+5:30
'धुरंधर २'च्या या अभूतपूर्व यशामुळे इतर चित्रपटांच्या रिलीज डेटवरही परिणाम झाला आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! रणवीर सिंहच्या सिनेमानं १९ दिवसांमध्ये किती कोटी कमावले?
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. केवळ भारतच नाही तर, जगभरात या सिनेमाने धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १९ दिवस उलटले असून क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाहीये.
रणवीर सिंहच्या चित्रपटाची भारतातील एकूण कमाई १०२३.७७ कोटी इतकी झाली आहे. तर, जगभरात या सिनेमाने १६२२.७२ कोटींची कमाई केली आहे. भारतात बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींचा टप्पा पार करणारा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा 'पुष्पा २' व 'बाहुबली २'नंतर तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. 'पुष्पा २'ने भारतात ११२०. १० कोटींची कमाई केली होती. तर 'बाहुबली २' या सिनेमाने १४३० कोटींची कमाई केली होती.
'धुरंधर २'च्या या अभूतपूर्व यशामुळे इतर चित्रपटांच्या रिलीज डेटवरही परिणाम झाला आहे. निर्माती एकता कपूर हिने सोशल मीडियावर घोषणा केली आहे की, १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा 'भूत बंगला' आता १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल. काही समीक्षकांनी या चित्रपटाला 'प्रपोगंडा' म्हटले असले, तरी प्रेक्षकांनी मात्र या टिकेला झुगारून देत चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. नकारात्मक रिव्ह्यूचा कोणताही परिणाम बॉक्स ऑफिसवर झालेला नाही. उलट हा चित्रपट आता 'पुष्पा २' व 'बाहुबली २' चा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.