"मी शाहरुख खान बनू शकलो नाही, पण...", बॉलिवूडचा सुपरस्टार न होण्याबाबत स्पष्टच बोललेला अक्षय खन्ना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:26 IST2025-12-11T10:25:33+5:302025-12-11T10:26:19+5:30
Akshaye Khanna Viral Interview: सिनेमे तर हिट झाले पण मुख्य भूमिका साकारूनही अक्षयला हवं तसं स्टारडम मिळालं नाही. बॉलिवूड स्टार होऊ न शकल्याबाबत अक्षयने एका मुलाखतीत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं होतं.

"मी शाहरुख खान बनू शकलो नाही, पण...", बॉलिवूडचा सुपरस्टार न होण्याबाबत स्पष्टच बोललेला अक्षय खन्ना
'दृश्यम २', 'छावा' आणि आता 'धुरंधर' अक्षय खन्नाने या वर्षात जोरदार कमबॅक केलं आहे. 'छावा'मध्ये साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेनंतर आता त्याची 'धुरंधर' मधील रहमान डकैतची भूमिका व्हायरल होत आहे. ज्याप्रकारे अक्षय खन्नाने ही भूमिका साकारली आहे. ते पाहून चाहते थक्क झाले आहेत आणि त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. हिरोच्या भूमिका साकारून जेवढं प्रेम आणि प्रसिद्धी अक्षय खन्नाला मिळाली नाही. तेवढी त्याला या निगेटिव्ह म्हणजेच खलनायकाच्या भूमिकेने मिळवून दिली आहे.
खरं तर अक्षय खन्ना हा स्टारकिड... सुपरस्टार विनोद खन्ना यांचा मुलगा असलेल्या अक्षयने 'हिमालय पुत्र' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'बॉर्डर', 'हंगामा', 'दिल चाहता है', 'हलचल', 'हमराझ', 'दिवानगी', 'रेस' अशा सिनेमांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसला. त्याचे सिनेमे तर हिट झाले पण मुख्य भूमिका साकारूनही अक्षयला हवं तसं स्टारडम मिळालं नाही. बॉलिवूड स्टार होऊ न शकल्याबाबत अक्षयने एका मुलाखतीत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं होतं.
Throwback to this interview of #AkshayeKhanna when he was asked why he could not become a star. pic.twitter.com/yyalj1pqDi
— Dr. Rahul Baxi (@baxirahul) December 8, 2025
"स्टारडम मोठ्या पडद्यावर केलेल्या कामामुळे मिळत नाही. किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात, यानेही मिळत नाही. रतन टाटा किंवा धीरुभाई अंबानी यांच्यासारखं स्थान मिळवलं नाही म्हणून तुम्ही ५०० कोटींच्या कंपनीच्या बिजनेसला अपयशी म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे मी शाहरुख खान बनू शकलो नाही. याचा अर्थ असा होत नाही की मी यश पाहिलचं नाही. माझ्यासाठी माझं यश या तुलनेपेक्षा खूप मोठं आहे", असं अक्षय म्हणाला होता.