"माझा प्रिय शिष्य आज...", आदित्य धरच्या यशावर दिग्दर्शक प्रियदर्शन यांची कौतुकास्पद पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:14 IST2026-01-09T14:14:08+5:302026-01-09T14:14:57+5:30
प्रियदर्शन यांनी एका सिनेमाच्या सेटवरचा जुना फोटो शेअर केला आहे.

"माझा प्रिय शिष्य आज...", आदित्य धरच्या यशावर दिग्दर्शक प्रियदर्शन यांची कौतुकास्पद पोस्ट
'हेरा फेरी', 'हंगामा', 'भूल भुलैय्या' असे अनेक हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा 'हैवान' सिनेमा लवकरच येणार आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खान अनेक वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. 'धुरंधर'फेम दिग्दर्शक आदित्य धर हा शिष्य आहे. आदित्यच्या सिनेमाची एवढी चर्चा होत असतानाच प्रियदर्शन यांनी आदित्यसोबतचा जुना फोटो पोस्ट केला आहे. तसंच त्याचं कौतुक करणारं कॅप्शनही लिहिलं आहे.
प्रियदर्शन यांनी एका सिनेमाच्या सेटवरचा जुना फोटो शेअर केला आहे. यामध्ये आदित्य धर अगदीच नवखा, तरुण दिसत आहे. प्रियदर्शन लिहितात,"माझा शिष्य आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे याहून दुसरा आनंद तो काय. धुरंधर साठी खूप खूप अभिनंदन, आदित्य. धुरंधर २ साठी शुभेच्छा."
यावर आदित्य धरने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, 'माझे प्रिय सर, आज तुमचे हे शब्द माझ्यासाठी किती अमूल्य आहेत हे मी शब्दात सांगू शकत नाही. मी कोणीही नसताना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला होता. माझ्याजवळ फक्त आत्मविश्वास आणि काही लिहिलेली पानं होती. तुम्ही मला बरोबरीचं स्थान दिलं आणि फक्त कामच नाही तर त्याहून जास्त सम्मान, विश्वास आणइ आपलेपणा दाखवला. फिल्मी दुनियेत काय नाही करायला पाहिजे हे आम्ही शिकलो तेव्हा तुम्ही मला काय केलं पाहिजे हे शिकवलंत. फिल्ममेकर म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही तुम्ही मला शिकवण दिली. आज इथपर्यंत पोहोचताना प्रत्येक माझ्या प्रत्येक पावलावर तुमची छाप आहे. मी नेहमीच तुमचा विद्यार्थी राहीन. प्रत्येक गोष्टीसाठी तुमचे आभार. हे यश जितकं माझं आहे तितकंच तुमचंही आहे."