'धुरंधर'चा धुमाकूळ! आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी; अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा रेकॉर्ड धोक्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 18:36 IST2026-01-19T18:35:28+5:302026-01-19T18:36:38+5:30
येत्या काळात चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

'धुरंधर'चा धुमाकूळ! आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी; अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा रेकॉर्ड धोक्यात?
Dhurandhar Box Office Worldwide Collection : रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची देशभरात किंबहुना परदेशातही तेवढीच हवा झाली. 'धुरंधर' प्रदर्शित होऊन ४४ दिवस झाले आहेत आणि आज ४५ व्या दिवशीही चित्रपट चांगली कमाई करत आहे.
जगभरातील कलेक्शनच्या आकडेवारीवर नजर टाकता, 'धुरंधर'ने आतापर्यंत अंदाजे १,३२८ कोटी कमावले आहेत आणि त्याची कमाई अजूनही सुरूच आहे. भारतातील निव्वळ कलेक्शनच्या बाबतीत,आतापर्यंत अंदाजे ८७९ कोटी कमावले आहेत. सध्या, 'पुष्पा २' या यादीत अव्वल स्थानावर आहे. ज्याचे भारतातील निव्वळ कलेक्शन १२३४ कोटी आहे. जर हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर येत्या काळात चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
केव्हा प्रदर्शित होणार धुरंधर चा सिक्वेल?
आदित्य धर दिग्दर्शित हा स्पाय-थ्रिलर सिक्वेल १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या भागात रणवीर सिंगसोबतच संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. या चित्रपटाची थेट टक्कर दाक्षिणात्य सुपरस्टार यश याच्या 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटाशी होणार आहे.