'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरला होता 'हा' गंभीर आजार, वाचताना-लिहिताना व्हायचा प्रचंड त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:48 IST2025-12-25T13:46:50+5:302025-12-25T13:48:35+5:30
अक्षरं ओळखताना व्हायचा त्रास, 'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरला कोणता आजार होता?

'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरला होता 'हा' गंभीर आजार, वाचताना-लिहिताना व्हायचा प्रचंड त्रास
Aditya Dhar Struggled With Dyslexia : सध्या आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'चित्रपटाची एकच हवा आहे. प्रत्येकाच्या ओठांवर फक्त 'धुरंधर'चं नाव आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. यामुळे सध्या सर्वत्र आदित्यचं कौतुक होत आहे. पण, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला एका मोठ्या शारीरिक आणि मानसिक संघर्षातून जावं लागलं आहे. आदित्यला 'डिस्लेक्सिया' गंभीर आजार होता.
'डिस्लेक्सिया' हा असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला वाचणे, लिहिणे आणि अक्षरे ओळखणे कठीण जाते. अक्षरे डोळ्यांसमोर नाचणे किंवा शब्दांचा गोंधळ उडणे, अशा समस्या आदित्य धरला बालपणापासून होत्या. या आजाराला त्यानं कधीच आपल्या प्रतिभेच्या आड येऊ दिले नाही.
आदित्यनं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.टेक पदवी मिळवलेली आहे. इतकेच नाही तर कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्येही यश मिळवलं. 'डिस्लेक्सिया' आजार असलेल्या व्यक्तीनं आपलं शिक्षण पूर्ण करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
एका मुलाखतीमध्ये आदित्यनं सांगितलं होतं की, "आज मी इथे नसतो. हा एक चमत्कारच आहे की मी इथे आहे. आजही जर मला वाचन करायचं असेल तर २-३ पानं वाचण्यासाठी मला पूर्ण दिवस जातो".
आदित्य धरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ४ जून २०२१ रोजी त्यानं अभिनेत्री यामी गौतमशी लग्नगाठ बांधली. हिमाचल प्रदेशमध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं त्यांचं लग्न पार पडलं होतं. त्यानंतर १० मे २०२५ रोजी या जोडप्याला 'वेदविद' नावाचा मुलगा झाला.