वयाच्या १९व्या वर्षीच पडलं टक्कल अन् आत्मविश्वास गमावला, अक्षय खन्नाचा भावनिक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:12 IST2025-12-11T13:12:00+5:302025-12-11T13:12:57+5:30
अक्षयच्या आयुष्यात असा एक काळ होता, जेव्हा अभिनेत्यानं त्याचा आत्मविश्वास गमावला होता.

वयाच्या १९व्या वर्षीच पडलं टक्कल अन् आत्मविश्वास गमावला, अक्षय खन्नाचा भावनिक खुलासा
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आहे. 'छावा' आणि आता 'धुरंधर' अक्षय खन्नाने या वर्षात जोरदार कमबॅक केलं आहे. 'छावा'मध्ये साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेनंतर आता त्याची 'धुरंधर'मधील रहमान डकैतची भूमिका व्हायरल होत आहे. ज्याप्रकारे अक्षय खन्नाने ही भूमिका साकारली आहे. ते पाहून चाहते थक्क झाले आहेत आणि त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, तुम्हाला माहितेय अक्षयच्या आयुष्यात असा एक काळ होता, जेव्हा अभिनेत्यानं त्याचा आत्मविश्वास गमावला होता. अक्षय खन्नाला करिअर सुरू होण्यापूर्वीच केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागले होते.
विनोद खन्ना यांचा मुलगा असलेल्या अक्षयने एका जुन्या मुलाखतीत आपल्या टक्कल पडण्याच्या समस्येबद्दल पहिल्यांदा उघडपणे सांगितले होते. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत त्याने वेदना व्यक्त केल्या होत्या. तो म्हणाला होता, "हे खूप लहान वयात सुरू झाले. एखाद्या पियानो वादकाने बोटं गमावल्यासारखी ती स्थिती होती. जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट खऱ्या अर्थाने स्वीकारत नाही, तोपर्यंत ती तुम्हाला त्रास देत राहते".
अक्षयने सांगितले की, "जेव्हा तुम्हाला वयाच्या १९ किंवा २० व्या वर्षी टक्कल पडल्याचं स्वीकारावं लागतं. तेव्हा ते खूप दुःखद असतं. ते तुम्हाला मानसिकरित्या पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतं. कारण एका अभिनेत्यासाठी चेहरा आणि दिसणं खूप महत्त्वाचे असतं".
अक्षय किती कोटींचा मालक?
अक्षयने हिमालय पुत्र या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण कालांतराने तो टक्कल पडण्याचा शिकार होऊ लागला. यानंतर अभिनेत्याने दोन वर्षांचा ब्रेक घेतला. पण त्यानंतर २००१ मध्ये त्याने दिल चाहता है या चित्रपटाने धमाकेदार पुनरागमन केलं होतं. अक्षयच्या संपत्ती बद्दल बोलायचे झाल्यास १६७ कोटी रुपये त्याचे नेटवर्थ आहे. या अभिनेत्याची मुंबई, दिल्ली आणि पुण्यात मालमत्ता आहे. त्याच्याकडे ऑडी, बीएमडब्ल्यू आणि होंडा सीआर-व्ही सारख्या गाड्या आहेत. 'छावा' चित्रपटासाठी या अभिनेत्याने २.५ कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे.