'धुरंधर' हिट होताच एक्स गर्लफ्रेंड झाली फिदा! म्हणाली, "शाळेपासून माहीत होतं तू मोठा स्टार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:49 IST2025-12-11T14:40:21+5:302025-12-11T14:49:18+5:30
EX गर्लफ्रेंडनं 'धुरंधर' पाहून अक्षय खन्नाचं केलं कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाली....

'धुरंधर' हिट होताच एक्स गर्लफ्रेंड झाली फिदा! म्हणाली, "शाळेपासून माहीत होतं तू मोठा स्टार..."
सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे, ती 'धुरंदर' सिनेमा आणि अक्षय खन्नाच्या हटके डान्सची. अक्षय खन्नाचा Fa9la या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘धुरंधर’च्या Fa9la गाण्यामधील अक्षय खन्नाच्या परफॉरमन्सवर सगळेच फिदा झाले आहेत. इन्स्टाग्राम रील्सवर अनेक सेलिब्रिटी या व्हायरल गाण्यावर स्वत:चे व्हिडीओ शेअर करीत आहेत. अक्षयच्या या यशाचं कौतुक करण्याचा मोह त्याच्या एक्स गर्लफ्रेंडलाही आवरला नाही.
अक्षयची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री तारा शर्मा हिने एक जुना फोटो शेअर करत त्याचे अभिनंदन केलं आहे. तिने अक्षयसाठी लिहलं, "खूप खूप शुभेच्छा... अजून चित्रपट पाहिला नाही, पण इंस्टाग्राम फीड फक्त 'धुरंधर'नं भरलेलं आहे. विशेषत: ते गाणे आणि तुझी एन्ट्री. तर तुझं आणि टीमचं खूप खूप अभिनंदन... आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतो... त्यामुळे तुला अभिनयाची तुझी आवड अशी जपताना पाहताना खूप छान वाटतंय".
ती म्हणाली, "आपल्या शाळेतील नाटकांमधूनच कदाचित आपण अभिनयाच्या जगात पहिलं पाऊल टाकलं आणि तेव्हाच आम्हाला माहिती होतं की तू पुढे याच क्षेत्रात काहीतरी मोठं करणार आहेस. कदाचित मी ओळखत असलेल्या आयुष्य खाजगी ठेवणाऱ्या व्यक्तींपैकी तू एक आहेस. तुझ्या मेहनतीला फळ मिळताना पाहून मी खूप आनंदी आहे", या शब्दात तिनं अक्षयला शुभेच्छा दिल्या.
ब्रेकअपनंतरही मैत्री कायम
तारा शर्मा आणि अक्षय खन्ना हे बालपणीचे मित्र होते आणि एकेकाळी ते एकमेकांना डेट करत होते. पण, काही काळानंतर ते वेगळे झाले. पण, ब्रेकअपनंतरही त्यांची मैत्री अबाधित राहिली. तारा शर्माने २००७ मध्ये रूपक सलुजाशी लग्न केले. अक्षय खन्ना पाहुण्यांच्या यादीत होता. द टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तारा म्हणाली होती, "अक्षय आणि माझं खूप पूर्वी ब्रेकअप झालं. पण, आम्ही नेहमीच मित्र आहोत". दरम्यान, अक्षय खन्नानं अद्याप लग्न केलेलं नाही. वयाच्या ५० व्या वर्षी देखील तो एकटाच आहे