'धुरंधर: द रिव्हेंज'ची कमाई सुसाट, फक्त ६ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी, आकडा वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:53 IST2026-03-25T11:51:43+5:302026-03-25T11:53:54+5:30

जाणून घ्या 'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

Dhurandhar 2: The Revenge Day 6 Box Office Collection 919 Crore Worldwide | 'धुरंधर: द रिव्हेंज'ची कमाई सुसाट, फक्त ६ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी, आकडा वाचून थक्क व्हाल

'धुरंधर: द रिव्हेंज'ची कमाई सुसाट, फक्त ६ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी, आकडा वाचून थक्क व्हाल

Dhurandhar 2 Worldwide Collection: सध्या 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) या सिनेमाची भारतात नव्हे तर जगभरात चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा कमाईच्या बाबतीत अनेक सिनेमांना मागे टाकत आहे.  या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ६ दिवस झाले असून आज सातवा दिवस आहे.  या स्पाय-थ्रिलरने चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांत अनेक बिग बजेट चित्रपटांचे 'लाईफटाईम कलेक्शन'ला मागे टाकलं आहे. जाणून घ्या 'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट.

'Sacnilk' आणि 'Bollywood Hungama' च्या ताज्या अहवालानुसार, 'धुरंधर २' ने जगभरात ९१९ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' (९१७ कोटी) आणि सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' (९१८.१८ कोटी) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या एकूण कमाईला अवघ्या एका आठवड्यात मागे टाकले आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' पेड प्रीव्ह्यूजसह पहिल्यादिवशी १४५ कोटींची दणदणीत ओपनिंग केली होती. त्यानंतरही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील आपली पकड कमी होऊ दिली नाही. काल ६ व्या दिवशी 'धुरंधर: द रिव्हेंज'ने देशभरात ५६.५५ कोटींची निव्वळ कमाई (नेट कलेक्शन) केली. यामुळे चित्रपटाची एकूण भारतातील ग्रॉस कमाई ६८७.४३ कोटींवर पोहोचली असून निव्वळ (नेट) कमाई ५७५.६७ कोटी इतकी झाली आहे. परदेशात या चित्रपटाने आतापर्यंत २३१.५७ कोटींची ग्रॉस कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाची एकूण जागतिक (वर्ल्डवाइड) कमाई ९१९ कोटींवर पोहोचली आहे.

पहिल्या भागाचा विक्रम लवकरच मोडीत काढणार

'धुरंधर'च्या पहिल्या भागाने जगभरात तब्बल १३०० कोटी रुपयांची कमाई केली होती आणि रिलीज झाल्यानंतर तीन महिन्यांनंतरही तो थिएटरमध्ये यशस्वीपणे चालू होता. त्यामुळे 'धुरंधर २' हा पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा विक्रम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  'धुरंधर २' चा सध्याचा वेग पाहता, हा चित्रपट पहिल्या भागाचा विक्रम लवकरच मोडीत काढेल आणि १,५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये 'हाऊसफुल' बोर्डासह सुरू आहे.

Web Title : 'धुरंधर: द रिवेंज' की दहाड़: सिर्फ छह दिनों में ₹919 करोड़!

Web Summary : 'धुरंधर: द रिवेंज' ने छह दिनों में दुनिया भर में ₹919 करोड़ कमाए, 'एनिमल' और 'बजरंगी भाईजान' को पीछे छोड़ा। फिल्म ने ₹145 करोड़ के साथ मजबूत शुरुआत की और जल्द ही पहली फिल्म के ₹1300 करोड़ के रिकॉर्ड को तोड़ने की राह पर है। सिनेमाघरों में सफल प्रदर्शन जारी है।

Web Title : 'Dhurandhar: The Revenge' Roars: ₹919 Crore in Just Six Days!

Web Summary : 'Dhurandhar: The Revenge' grosses ₹919 crore worldwide in six days, surpassing 'Animal' and 'Bajrangi Bhaijaan'. The film opened strong with ₹145 crore and is poised to break the first film's ₹1300 crore record soon. It continues its successful run in theaters.