'बॉर्डर २' सोबत 'धुरंधर २'चा धमाका! चित्रपटगृहात प्रेक्षकांना मिळेल सरप्राईज, निर्मात्यांचा मास्टरस्ट्रोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 11:55 IST2026-01-19T11:54:32+5:302026-01-19T11:55:17+5:30

आदित्य धर यांचा 'मास्टरस्ट्रोक', 'धुरंधर २' ची झलक पाहायला मिळणार मोठ्या पडद्यावर

Dhurandhar 2 Teaser To Be Released With Border 2 In Theatres | 'बॉर्डर २' सोबत 'धुरंधर २'चा धमाका! चित्रपटगृहात प्रेक्षकांना मिळेल सरप्राईज, निर्मात्यांचा मास्टरस्ट्रोक

'बॉर्डर २' सोबत 'धुरंधर २'चा धमाका! चित्रपटगृहात प्रेक्षकांना मिळेल सरप्राईज, निर्मात्यांचा मास्टरस्ट्रोक

दिग्दर्शक आदित्य धर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर प्रेक्षकांमध्ये त्याच्या दुसऱ्या भागाची, म्हणजेच 'धुरंधर २'ची मोठी उत्सुकता आहे. 'धुरंधर २'चे प्रमोशन करण्यासाठी निर्मात्यांनी 'बॉर्डर २' या चित्रपटाची निवड केली आहे. २३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या सनी देओलच्या 'बॉर्डर २' सोबत 'धुरंधर २'चा टीझर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य धर यांनी 'धुरंधर'च्या पहिल्या भागातील एंड-क्रेडिट सीक्वेन्सला एका विशेष टीझरच्या स्वरूपात पुन्हा संपादित केले आहे. २३ जानेवारीला जेव्हा प्रेक्षक 'बॉर्डर २' पाहण्यासाठी चित्रपटगृहात येतील, तेव्हा त्यांना मोठ्या पडद्यावर 'धुरंधर २' च्या प्रदर्शनाची तारीख आणि काही नवीन दृश्यांची झलक पाहायला मिळेल.

'बॉर्डर २' आणि 'धुरंधर २' हे दोन्ही चित्रपट देशभक्तीवर आधारित आहेत. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती आणि वितरणामध्ये 'जिओ स्टुडिओज'चा मोठा सहभाग आहे. हा खास टीझर सुरुवातीला फक्त चित्रपटगृहांमध्येच उपलब्ध असेल आणि त्यानंतर तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल.

बॉक्स ऑफिसवर 'टॉक्सिक'शी होणार सामना
'धुरंधर २' च्या प्रदर्शनाबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा होत्या, मात्र आता हे स्पष्ट झाले आहे की हा चित्रपट नियोजित वेळेतच प्रदर्शित होईल. फेब्रुवारी २०२५ च्या अखेरीस ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.  तर १९ मार्च २०२६ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार यश याचा 'टॉक्सिक' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळेल. आदित्य धर यांनी स्पष्ट केले आहे की, प्रदर्शनाची तारीख बदलली जाणार नाही.

Web Title : 'बॉर्डर 2' के साथ 'धुरंधर 2' का धमाका! सिनेमाघरों में सरप्राइज!

Web Summary : आदित्य धर की 'धुरंधर 2' का टीजर 'बॉर्डर 2' के साथ रिलीज होगा। देशभक्ति फिल्म 19 मार्च, 2026 को 'टॉक्सिक' से टकराएगी। ट्रेलर फरवरी 2025 में आएगा।

Web Title : 'Border 2' and 'Dhurandhar 2' team up for cinematic surprise!

Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar 2' teaser will premiere with 'Border 2'. The patriotic film's release date is March 19, 2026, clashing with 'Toxic'. The trailer arrives in February 2025.