'धुरंधर २'नंतर 'धुरंधर ३' येणार? मेकर्सची मोठी तयारी; आदित्य धर प्रेक्षकांना देणार सुखद धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:50 IST2026-03-16T15:50:02+5:302026-03-16T15:50:20+5:30
१९ मार्चला 'धुरंधर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

'धुरंधर २'नंतर 'धुरंधर ३' येणार? मेकर्सची मोठी तयारी; आदित्य धर प्रेक्षकांना देणार सुखद धक्का?
Aditya Dhar : आदित्य धर दिग्दर्शित व रणवीर सिंह अभिनीत २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील अक्षय खन्नाचे सीन्स, डान्स स्टेप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाबद्दल उत्सुकता होती. आता १९ मार्चला 'धुरंधर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा भाग प्रदर्शित होण्यापूर्वीच सिनेसृष्टीत 'धुरंधर ३' च्या चर्चांनी जोर धरला आहे.
'व्हरायटी इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'धुरंधर २'ला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये प्रतिसाद प्रचंड मिळत आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा तिसरा भागही तयार व्हावा, अशी स्टुडिओची इच्छा आहे. हा विषय असा आहे की ज्यावर अनेक भाग तयार केले जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य धरकडे तिसऱ्या भागासाठी एक संकल्पना आधीच तयार आहे, मात्र त्यानं अद्याप अधिकृतरीत्या कोणताही होकार दिलेला नाही.
पोस्ट-क्रेडिट टीझरची शक्यता
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी, निर्मात्यांनी आदित्य धरला चित्रपटाच्या शेवटी एक 'पोस्ट-क्रेडिट टीझर' जोडण्याची विनंती केली आहे. या टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांना तिसऱ्या भागाचे संकेत दिले जाऊ शकतात. जर असे झाले, तर 'धुरंधर ३' वर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
एककीडे स्टुडिओ फ्रँचायझी वाढवण्यासाठी उत्सुक असताना, दुसरीकडे आदित्य धरची विचारसरणी थोडी वेगळी आहे. आदित्यला फ्रँचायझींवर काम करण्यापेक्षा नवीन आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करण्यास अधिक रस आहे. त्याला चित्रपट एकाच विषयात अडकवून ठेवणे आवडत नाही. त्यामुळे, निर्मात्यांचा आग्रह आणि आदित्यची सर्जनशीलता यामध्ये 'धुरंधर ३' चा निकाल काय लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.