'धुरंधर २'च्या चाहत्यांसाठी खुशखबर! रिलीजच्या एक दिवस आधीच पाहता येणार सिनेमा, कसं कराल बुकिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:29 IST2026-03-07T16:28:50+5:302026-03-07T16:29:15+5:30
'धुरंधर २' सिनेमा येत्या १९ मार्चला प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र चाहत्यांना 'धुरंधर २' रिलीजच्या एक दिवस आधीच पाहता येणार आहे. यासाठी अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

'धुरंधर २'च्या चाहत्यांसाठी खुशखबर! रिलीजच्या एक दिवस आधीच पाहता येणार सिनेमा, कसं कराल बुकिंग?
Dhurandhar 2: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिनेप्रेमींसाठी आणि 'धुरंधर २' पाहण्यासाठी आतुर झालेल्या चाहत्यांसाठी आणखी एक खूशखबर आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' सिनेमा येत्या १९ मार्चला प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र चाहत्यांना 'धुरंधर २' रिलीजच्या एक दिवस आधीच पाहता येणार आहे. यासाठी अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.
'धुरंधर २'चे काही पेड प्रिव्ह्यू शो टीमकडून आयोजित करण्यात आले आहेत. सिनेमा १९ मार्चला रिलीज होणार आहे. मात्र हे पेड प्रिव्ह्यू शोचे स्क्रिनिंग १८ मार्चपासून संध्याकाळी ५ वाजता सिनेमागृहात दाखवले जाणार आहेत. 'धुरंधर २'चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर सिनेमाच्या पेड प्रिव्ह्यू शोचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू करण्यात आलं आहे. संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी 'धुरंधर २'चे हे पेड प्रिव्ह्यू शो होणार आहेत. यासाठी चाहत्यांना ऑनलाइन बुकिंग करावं लागणार आहे. बुक माय शोवर 'धुरंधर २'चे पेड प्रिव्ह्यू शोच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही तासांतच तब्बल ७ हजार तिकिटांची विक्रीही झाली आहे.
पेड प्रिव्ह्यू शो म्हणजे काय?
सिनेमांची चर्चा होण्यासाठी आणि क्रेझ निर्माण करण्यासाठी काही सिनेमे हे रिलीजच्या एक दिवस आधीच रिलीज केले जातात. यामुळे चाहत्यांना सिनेमा रिलीज व्हायच्या अगोदरच तो पाहता येतो. यासाठी अॅडव्हान्स बुकिंगमधून चाहत्यांना तिकीट काढता येतं. आतादेखील 'धुरंधर २'च्या पेड प्रिव्ह्यू शोसाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. मात्र फक्त १८ मार्चच्या शोसाठी हे बुकिंग आहे. १९ मार्च म्हणजे जेव्हा सिनेमा रिलीज होणार आहे तेव्हाच्या अॅडव्हान्स बुकिंगला अद्याप सुरुवात झालेली नाही.
आदित्य धरने 'धुरंधर २'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात रणवीर सिंग, आर माधवन, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, दानिश पंडोर, राकेश बेदी हे कलाकार दिसणार आहेत. येत्या १९ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.