बॉक्स ऑफिसवर १४ दिवसांचा थरार! 'धुरंधर २'ची जगभरात क्रेझ, १५०० कोटींचा टप्पा लवकरच गाठणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:41 IST2026-04-02T15:40:05+5:302026-04-02T15:41:11+5:30
Dhurandhar 2 Box Office Collection: १४ दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवण्यात 'धुरंधर २'ला यश मिळालं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

बॉक्स ऑफिसवर १४ दिवसांचा थरार! 'धुरंधर २'ची जगभरात क्रेझ, १५०० कोटींचा टप्पा लवकरच गाठणार
Dhurandhar 2: आदित्य धरचं दिग्दर्शन असलेल्या 'धुरंधर २'ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट पळत आहे. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड 'धुरंधर २'ने मोडले. १४ दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवण्यात 'धुरंधर २'ला यश मिळालं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे.
'धुरंधर २'ने पहिल्याच दिवशी पेड प्रिव्ह्यू शोच्या कमाईसहित एकूण १४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर एका आठवड्यातच सिनेमाने ६७४ कोटींचा बिजनेस केला होता. तर दुसऱ्या आठवड्यात सिनेमाची कमाई घटल्याचं पाहायला मिळालं. 'धुरंधर २'ने दुसऱ्या आठवड्यात एकूण २४५ कोटी कमावले. १४ दिवसांनंतर सिनेमाने देशात ९०० कोटींचा बिजनेस केला आहे. तर जगभरात एकूण १४६६ कोटी कमावले आहेत.
पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या आणि तिथल्या दहशतवादी कारवायांची माहिती भारताला गुप्त पद्धतीने देणाऱ्या भारतीय गुप्तहेराची कहाणी 'धुरंधर' मध्ये दाखवण्यात आली होती. याच सिनेमाचा 'धुरंधर २' हा सीक्वल आहे. या सिनेमात रणवीर सिंग, संजय दत्त, सारा अर्जुन, आर माधवन, राकेश बेदी, अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका आहेत.