व्यक्तीला खरोखर आग लावली, तो सेटवरच पळत सुटला अन्...; 'धुरंधर २'च्या 'त्या' सीनचा अंगावर काटा आणणारा BTS व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:06 IST2026-03-23T17:05:08+5:302026-03-23T17:06:19+5:30
'धुरंधर २' मधल्या फायटिंग सीक्वेन्सच्या सीनचा शूटिंग करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अॅक्शन सीन कसा शूट गेला हे दाखवण्यात आलं आहे.

व्यक्तीला खरोखर आग लावली, तो सेटवरच पळत सुटला अन्...; 'धुरंधर २'च्या 'त्या' सीनचा अंगावर काटा आणणारा BTS व्हिडीओ
Dhurandhar 2: आदित्य धरचं दिग्दर्शन असलेला 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. प्रदर्शित होताच 'धुरंधर २'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'धुरंधर २'चं आणि त्यातील कलाकारांचंही सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर या सिनेमातील अनेक व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहेत. 'धुरंधर २'च्या शूटिंगचे काही BTS व्हिडीओही समोर आले आहेत.
'धुरंधर २' मधल्या फायटिंग सीक्वेन्सच्या सीनचा शूटिंग करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अॅक्शन सीन कसा शूट गेला हे दाखवण्यात आलं आहे. रहमान डकैतचा मृत्यू झाल्यानंतर हमजा अली मदारी ल्यारीमध्ये दहशत निर्माण करतो. तेव्हा अर्शद पप्पूच्या गुंडांसोबत अनेक फायटिंग सीक्वेन्स दाखवण्यात आले आहेत. शेअर करण्यात आलेल्या BTS व्हिडीओमध्ये दिसतंय की सीन खरा वाटावा म्हणून त्या व्यक्तीच्या अंगाला खरोखरच आग लावली आहे. रणवीर सिंगही या सीनमध्ये दिसत आहे. सीनचं शूटिंग होताच ती आग लगेचच विझवली जात असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हे सीन शूट करताना कलाकाराला कोणतीही दुखापत होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतल्याचंही दिसत आहे.
रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. भारतातील 'धुरंधर २' या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ४५४.१२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर 'धुरंधर २'ने जगभरात ६९१.३२ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. ज्या वेगाने हा चित्रपट कमाई करत आहे, ते पाहता लवकरच हा चित्रपट ८०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.