'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर कहर! ७ दिवसांत किती कोटींची केली कमाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:06 IST2026-03-26T11:03:10+5:302026-03-26T11:06:37+5:30

रणवीर सिंगचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा थिएटरमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे.

Dhurandhar 2 Day 7 Box Office Collection 1000 Crore Worldwide | 'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर कहर! ७ दिवसांत किती कोटींची केली कमाई?

'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर कहर! ७ दिवसांत किती कोटींची केली कमाई?

Dhurandhar 2 Box Office Day 7 : १९ मार्च रोज प्रदर्शित झालेला रणवीर सिंगचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा थिएटरमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंगने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.  चित्रपटाच्या पहिल्या भागामुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे चित्रपटगृहे प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेली आहेत. काल रिलीजच्या सातव्या दिवशी, या चित्रपटाने १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे.

'Sacnilk'च्या ताज्या अहवालानुसार, 'धुरंधर: द रिव्हेंज'ने सातव्या दिवशी देशभरातील २०,३५२ शोमधून ४७.७० कोटींची नेट कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात एकूण ७४४.५८ कोटी ग्रॉस आणि ६२३.४२ कोटी नेट कलेक्शन केले आहे. परदेशात सातव्या दिवशी ११.९२ कोटींची कमाई झाली असून एकूण ओव्हरसीज कलेक्शन २६१.९२ कोटींवर पोहोचले आहे. यामुळे चित्रपटाची एकूण जागतिक कमाई (वर्ल्डवाइड) आता १,००६.५० कोटींवर पोहोचली आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज'नं जगभरात १,००६.५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' (९१७ कोटी), श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' (८५७ कोटी), विकी कौशलच्या 'छावा' (८०७ कोटी) आणि ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १' (८५२ कोटी) आणि सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' (९१८.१८ कोटी) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या एकूण कमाईला अवघ्या एका आठवड्यात मागे टाकले आहे. लवकरच हा चित्रपट 'कल्की २८९८ AD' (१०४२ कोटी) आणि शाहरुख खानच्या 'जवान' (११६० कोटी) या चित्रपटांना मागे टाकण्याची शक्यता आहे.
 

Web Title : 'धुरंधर: द रिवेंज' बॉक्स ऑफिस पर छाया, करोड़ों की कमाई!

Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर: द रिवेंज' ने बॉक्स ऑफिस पर धमाल मचाया, सात दिनों में दुनिया भर में ₹1,006.50 करोड़ की कमाई की। 'एनिमल' और 'बजरंगी भाईजान' को पछाड़ा। अब 'कल्कि 2898 AD' और 'जवान' को हराने की तैयारी।

Web Title : 'Dhurandhar: The Revenge' Roars at Box Office, Earns Crores!

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar: The Revenge' dominates box office, grossing ₹1,006.50 crore worldwide in seven days. Surpassed 'Animal' and 'Bajrangi Bhaijaan'. Eyes on beating 'Kalki 2898 AD' and 'Jawan' next.