Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा जगभरात डंका, पाच दिवसांत किती कोटींचा गल्ला कमावला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:09 IST2026-03-24T09:07:54+5:302026-03-24T09:09:12+5:30
"आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप" रजनीकांत यांची प्रतिक्रिया, कौतुक करत म्हणाले...

Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा जगभरात डंका, पाच दिवसांत किती कोटींचा गल्ला कमावला?
Dhurandhar 2 Worldwide Collection: दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग यांची जोडी सध्या बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवत आहे. 'धुरंधर'प्रमाणे 'धुरंधर: द रिव्हेंज'नेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवर नाही तर, जागतिक बॉक्स ऑफिसवर आपला डंका गाजवला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५ दिवस झाले. स्पाय-थ्रिलरने अवघ्या पाच दिवसांत यशाची नवी शिखरे सर केली आहेत.
'धुरंधर: द रिव्हेंज' पेड प्रीव्ह्यूजसह पहिल्यादिवशी १४५ कोटींची दमदार ओपनिंग केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८३ कोटी, तिसऱ्या दिवशी ११७ कोटी, चौथ्या दिवशी १२१ कोटीचा टप्पा पार करत देशांतर्गत एकूण निव्वळ बॉक्स ऑफिस कमाई ४६६ कोटी झाली. तर एकूण बॉक्स ऑफिस कमाई भारतात ५५० कोटी तर ओव्हरसीज २११ कोटी कमावत चित्रपटानं चार दिवसात ७६१ कोटी रुपयांची जागतिक कमाई केली. तर काल पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 'सॅकनिल्क'च्या एका अहवालानुसार, घट दिसून आली.
'धुरंधर: द रिव्हेंज'च्या कमाईत सोमवारी प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी या चित्रपटाने अंदाजे ६५.०० कोटींची कमाई केली. एकूणच, या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५१९.१२ कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, भारतातील चित्रपटाच्या एकूण कमाईवर नजर टाकल्यास, हा आकडा ६१९.७६ कोटींच्या आसपास असल्याचे दिसून येते. चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडत आहे. आदित्य धरच्या या चित्रपटाने परदेशात २३६.०० कोटींचा टप्पा गाठला असून, यामुळे चित्रपटाची जगभरातील पाच दिवसांची एकूण कमाई अंदाजे ८५६.०० कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, हे पाचव्या दिवसाच्या कमाईचे आकडे 'सॅकनिल्क'च्या अहवालानुसार आहेत. आज जिओ स्टुडिओकडून अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाईल.
रजनीकांत यांनी केलं कौतुक
दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी आदित्य धरला 'बॉक्स ऑफिसचा बाप' असे संबोधले. तसेच त्यांनी रणवीर सिंगच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. हा चित्रपट आता १,००० कोटींच्या दिशेने वेगाने कूच करत असून, येत्या काही दिवसांत हा टप्पाही पार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.