'धुरंधर २'चा धमाका! रणवीर सिंगच्या सिनेमाने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी, रेकॉर्डब्रेक कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 09:15 IST2026-03-22T09:14:06+5:302026-03-22T09:15:15+5:30
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट असून नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहे

'धुरंधर २'चा धमाका! रणवीर सिंगच्या सिनेमाने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी, रेकॉर्डब्रेक कमाई
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट असून नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली असून, अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने ३०० कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.
तिसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ
'धुरंधर २' ने पहिल्या दिवशी १०२.५५ कोटींची विक्रमी ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ८०.७२ कोटींची कमाई केली. मात्र, तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सुट्टीचा फायदा घेत चित्रपटाने तब्बल ११३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यामुळे चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन ३३९.२७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर जगभरातही या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे.
जगभरातील कमाईचा विचार करता या चित्रपटाने ३७० कोटींचा टप्पा ओलांडला असून तो लवकरच ४०० कोटींकडे वाटचाल करत आहे. या चित्रपटाने प्रभासच्या 'राजा साब' (२०८.३८ कोटी) या चित्रपटाच्या वर्ल्डवाईड कलेक्शनला मागे टाकले आहे.
'धुरंधर २' ने अवघ्या तीन दिवसांत बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचे लाइफटाइम रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. 'धुरंधर २' सोबत रिलीज झालेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचा 'उस्ताद भगत सिंह' हा चित्रपट देखील चित्रपटगृहात आहे. मात्र, 'धुरंधर २' च्या वादळापुढे हा चित्रपट फ्लॉप झालेला दिसतोय. 'उस्ताद भगत सिंह'ने तिसऱ्या दिवशी ९.१५ कोटींची कमाई केली असून त्याचे एकूण कलेक्शन ५२.९० कोटी रुपये झाले आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' ची ही घोडदौड पाहता, हा चित्रपट लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.