धोनी बायोपिकची शुटिंग औरंगाबादमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:11 IST2016-01-16T01:19:25+5:302016-02-09T10:11:28+5:30

चौकार, षटकार मारून विरोधी टीमच्या र्‍हदयात धडकी भरविणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची प्रेमकथा औरंगाबादेतच खुलली होती, यावर ...

Dhoni's biopic shooting in Aurangabad | धोनी बायोपिकची शुटिंग औरंगाबादमध्ये

धोनी बायोपिकची शुटिंग औरंगाबादमध्ये

कार, षटकार मारून विरोधी टीमच्या र्‍हदयात धडकी भरविणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची प्रेमकथा औरंगाबादेतच खुलली होती, यावर आधारित 'एम.एस.धोनी-दी अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला रविवारपासून शहरात सुरूवात झाली. धोनी व साक्षी रावत यांचा प्रेम मिलाफ ज्या वास्तूत झाला, त्या ताज हॉटेलच्या बाजूला असणार्‍या इंडीयन इन्स्टिट्युट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट येथे दिवसभर लाईट, कॅमेरा .. अँक्शन असा आवाज घुमत होता. या तीन दिवसांत चित्रपटाची शूटिंग शहर व आसपासच्या परिसरात झाली. 

चाहत्यांचा उत्साह शिगेला
'एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाची शूटिंग औरंगाबादला सुरू होणार या बातमीनेच सगळीकडे चैतन्य निर्माण झाले. महेंद्रसिंग धोनीची भूमिका करणारा सुशांतसिंग राजपूत केव्हा शहरात येतो अशी प्रतिक्षा लहानांपासून थोरांनाही लागली होती. अखेर ४ आॅक्टोबर पासून चित्रपटाच्या शूटिंगला हॉटेल ताज येथून सुरूवात झाली. कॅम्पसमध्ये एकच आवाज घुमत होता तो म्हणजे लाईट..कॅमेरा..अँक्शन ! हॉटेल ताज येथे जेव्हा शूटिंगची चर्चा सुरू झाली तेव्हा शहरातील सर्व युवापिढीने तिथे गर्दी केली. 

sushant

आपल्या आवडत्या क्रिकेटरची भूमिका करणा‍र्या सुशांतसिंग राजपूत याची एक झलक आपल्याला केव्हा पाहायला मिळते यासाठी ज्याला जिथेही जागा मिळेल अशा ठिकाणी गर्दी करत होते. हॉटेल ताज आणि हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या परिसरात चित्रपटाच्या शूटिंगमुळे फिल्मी वातावरण तयार झाले होते. महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून त्याच्या शैक्षणिक जीवनापासून, त्याची लव्ह लाईफ आणि तो सक्सेसफूल क्रिकेटर कसा बनला याविषयीचे सर्व चित्रीकरण करण्यात येणार आहे. साक्षी आणि महेंद्रसिंग प्रथम औरंगाबादलाच भेटले होते. त्यांच्यात प्रेमाचे अंकुर याच शहरात फुटले. त्यामुळे धोनीच्या आयुष्यातील औरंगाबाद हा महत्त्वाचा टप्पाच म्हणावा लागेल.

शिक्षणापासून जुळले प्रेमसंबंध
नीरज पांडे दिग्दर्शित हा चित्रपट महेंद्रसिंग धोनी व साक्षी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. साक्षी धोनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना या दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याने, महेंद्रसिंग धोनीने औरंगाबाद शहरालगतच्या पर्यटकस्थळासह शहरात रिक्षाने प्रवास केलेला आहे. त्या कथेला अनुसरून हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. चित्रपटाची शुटींग औरंगाबादपासून रविवार सुरू करण्यात आली. यामध्ये धोनीचे पात्र अभिनेता सुशांतसिंह राजपूत व धोनीची पूर्वश्रमीची प्रेयसी व आताची पत्नी साक्षी रावतची भूमीका अभिनेत्री कायरा अडवाणी साकारात आहे. खेळाडूंच्या जीवनावर बॉलीवूडने अनेक चित्रपट बनविलेले आहेत. 

dhoni

कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर हा चित्रपट असल्याने,सर्वांनाच त्याची उत्सुकता लागून आहे. त्यामुळे शुटींगदरम्यान चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे. २0१0 मध्ये साक्षीला भेटण्यासाठी शहरात आलेल्या धोनीने रिक्षाने प्रवास केला होता. त्याचे रविवारी चित्रीकरण करण्यात आले. बीबी-मकबरासह हे दोघे ज्या ज्या ठिकाणी फिरले तेथीलही शुटींग सोमवारी करण्यात आली. मकबरा येथील शुटींगदरम्यान एक गाणेही घेण्यात आहे. मंगळवारी हा शुटींगचा तिसरा दिवस होता. या दिवशी ताज हॉटेल समोरील आदर्श हॉटेलमध्ये साक्षीने घालविलेला काही बाबींची शुटींग घेण्यात आली. 

पहाटे सहा वाजेपासून याठिकाणी शुटींगला प्रारंभ झाला. हॉटेलमध्ये नाश्ता करतांना तसेच फ्रेंडससोबत मोैजमस्ती करतानाचेही शॉट शुट करण्यात आले. यादरम्यान बाहेर रस्त्यावर चाहत्यांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर शुटींगचा चमू जालना रोडवरील रामा इंटरनॅशलमध्ये दाखल झाला. तेथेही हे दोघे रिक्षाने येत असलेल्या शॉटचे शुटींग घेण्यात आले.या शुटींगदरम्यान काही स्थानीक रिक्षावाल्यांनाही रोल मिळाला आहे. विद्यापीठ परिसरातही हे रिक्षाने फिरत असल्याचे काही शॉट शुट करण्यात आले आहे. चित्रपटात धोनीचे पात्र अभिनेता सुशांतसिंह राजपूत व धोनीची पूर्वाश्रमीची प्रेयसी व आताची पत्नी साक्षी रावतची भूमिका अभिनेत्री कायरा अडवाणी साकारत आहे. 

dhoni

सर्व चमू शनिवारीच औरंगाबादेत दाखल झाला, आयआयएचएमला स्टुडिओचे स्वरूप आले होते. धोनीची प्रेयसी साक्षी रावतने २00८-१0 या काळात हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. मे २00८ मध्ये इंडियन प्रीमीअर लीगच्या मॅचेस सुरू होत्या. धोनी तेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार होता. साक्षीवरील प्रेमाखातर धोनीने वेळ काढून ११ मे रोजी औरंगाबाद गाठले होते. या दोघांनी मिळून रिक्षातून शहराचा फेरफटका मारला होता. बीबीका मकबरा, हनुमान टेकडी इ. परिसरातच त्यांचे प्रेम बहरले होते. धोनीच्या जीवनातील प्रेमकथेचा हा प्रसंग चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. त्याचीच शूटिंग सध्या सुरू आहे. 

चित्रपटातील कथानकानुसार जेव्हा धोनी औरंगाबादेत आल्याचे मीडीयाला कळते तेव्हा सर्व पऋकार आयआयएचएममध्ये पाहोचतात. मात्र त्यांना गेटवरच अडविण्यात येते. सुरक्षारक्षकास पत्रकार प्रश्न विचारतात 'धोनी यहां क्यु आया..किससे मिलने आया..' मात्र धोनी तेथे नसल्याचे सुरक्षारक्षक सांगतात, याप्रसंगाची शूटिंग घेण्यात आली. शूटिंग पाहण्यासाठी दिवसभर आयआयएचएमच्या बाहेर गर्दी होती. सर्वांना तोंड देताना सुरक्षारक्षकांच्या नाकीनऊ आले. चित्रपटातील कलाकार व तांत्रिक कामगारांशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. एवढा कडक बंदोबस्त येथे ठेवण्यात आला होता. 


dhoni

First Photo Source : Mango Bollywood

 

Web Title: Dhoni's biopic shooting in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.