सुशांत सिंग सोबत दिसला धोनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 11:45 IST2016-09-13T06:15:05+5:302016-09-13T11:45:05+5:30
सुशांत सिंग राजपूत सध्या त्याच्या ‘एम.एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी ’ चे प्रमोशन करीत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ...
.jpg)
सुशांत सिंग सोबत दिसला धोनी
स शांत सिंग राजपूत सध्या त्याच्या ‘एम.एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी ’ चे प्रमोशन करीत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका टीजरमध्ये महेंद्रसिंग धोनी दिसत आहे. यामध्ये धोनी खेळाच्या मैदानावर बॅटने शॉट मारताना दिसत आहे. या चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्ष्रकांना खूप पसंतीला उतरले आहे. परंतु, प्रतीक्षा आहे की, पडद्यावर धोनीची भूमिका करणाºया सुशांतला किती लोक पसंत करतात. या चित्रपटासाठी सुशांतने खूप मेहनत घेतलेली आहे. ३० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत असून, निलेश पांडेने त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. यामध्ये कियारा आडवाणी ही धोनीची पत्नीची भूमिका साकारत आहे. यामध्ये दिशा पाटाणीने धोनीच्या कथित प्रेयसीची भूमिका केली आहे.