भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित असलेला ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरपासूनच चर्चेत आहे. धोनीवर ...
धोनीने बघीतली स्वत: चीच बायोपिक
/>भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित असलेला ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरपासूनच चर्चेत आहे. धोनीवर आधारित असलेला हा चित्रपट स्वत : धोनीने बघीतला असल्याचे या चित्रपटातील अभिनेता तथा धोनीची भूमिका साकारणारा सुशांत सिंह राजपूतने एका मुलाखती दरम्यान सांगितले. सुशांतला साक्षीने विषयी विचारण्यात आले असता. त्याने साक्षीने बघीतला की नाही, याची मला माहिती नाही. परंतु, धोनीने तो बघीतला व तो यामुळे खूप आनंदीत झाला. चित्रपट बघीतल्यानंतर त्याने २० मिनीटे काहीच केले नाही व हसतच राहीला. यावरुन धोनीला हा चित्रपट आवडला असल्याचेही सुशांत म्हणाला. काही महिन्यापूर्वी तो मला रांची येथे भेटला होता. त्याला मी माझ्या ट्रेनिंगची व्हीडीओ दाखविले असतल्याचेही सुशांतने सांगितले. हा चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होत आहे. यामध्ये अपुनम खैर हे धोनीच्या वडिलांची भूमिका तर कियारा अडवाणी ही साक्षीची भूमिका साकारत आहेत. नीरज पांडे हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.