ढिंचॅक पूजा पुन्हा आली, नवे गाणे ‘बापू दे दे थोडा कॅश’ आऊट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 11:01 IST2017-07-25T05:31:39+5:302017-07-25T11:01:39+5:30
आपल्या ‘उटपटांग’गाण्यांनी सोशल मीडियावर ‘सणसणी’ निर्माण करणारी ढिंचॅक पूजा पुन्हा परतली आहे. होय, ढिंचॅक पूजाचे ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर धूम करते आहे.

ढिंचॅक पूजा पुन्हा आली, नवे गाणे ‘बापू दे दे थोडा कॅश’ आऊट!!
आ ल्या ‘उटपटांग’गाण्यांनी सोशल मीडियावर ‘सणसणी’ निर्माण करणारी ढिंचॅक पूजा पुन्हा परतली आहे. होय, ढिंचॅक पूजाचे ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर धूम करते आहे. २४ तासांपूर्वी रिलीज झालेले हे गाणे आत्तापर्यंत ३ लाख ६९ लोकांनी पाहिले आहे. मजेदार बाब म्हणजे, अन्य गाण्यांप्रमाणे या नव्या गाण्याच्या व्हिडिओत ढिंचॅक पूजा दिसत नाही. गाण्यात केवळ लिरिक्स आहेत. पूजाचा परफॉर्मन्स नाही. गेल्या आठवड्यात आपण लवकरच नवा व्हिडिओ घेऊन येणार अशी फेसबुक पोस्ट पूजाने अपलोड केली होती. त्यानुसार पूजाने व्हिज्युअल व्हिडिओऐवजी लिरिक्स व्हिडिओ मात्र अपलोड केलाय. याशिवाय पूजाच्या यूट्यूब अकाऊंटवर ‘सेल्फी मैंने लेली आज’ या जुन्या गाण्याचा व्हिडिओही दिसतो आहे.
ALSO READ : Watch Video : सोनू निगम बनला ढिंचॅक पूजाचा फॅन; कुमार सानूच्या स्टाइलमध्ये गायिले ‘दिलो का शूटर’!
दोन आठवड्यांपूर्वी ढिंच्याक पूजाच्या यू-ट्यूब चॅनलवरून तिचे व्हिडिओ काढून टाकण्यात आले होते. कथप्पा सिंह याच्या विनंतीवरून हे व्हिडिओ तिच्या यूट्युब चॅनेलवरून हटवले गेले होते. यू-ट्यूबच्या पॉलिसीनुसार, जर तुमच्या परवानगीशिवाय तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये दिसत असाल तर तो व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती तुम्ही यूट्युबला करू शकता आणि याच पॉलिसीमुळे तिचे व्हिडिओ चॅनेलवरून हटवण्यात आले असल्याची चर्चा होती. तिचे १२ व्हिडिओ हटवण्यात आले होते. अर्थात ढिंचॅक पूजाने याबद्दल अद्यापही कुठलाही खुलासा केलेला नाही. या प्रकरणापूर्वी तिच्यावर वाहतुकीचे नियम मोडले म्हणून दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. ‘सेल्फी मैंने ले ली आज’ आणि ‘पिंक स्कूटर’ या गाण्यांच्या व्हिडिओमुळे पूजा भलतीच चर्चेत आली होती. यू-ट्यूबवर तर पूजाच्या चॅनलला तब्बल १.८ लाख लोकांनी सब्सक्राइब केले आहे. ‘सेल्फी मैंने लेली आज’ या गाण्याला तब्बल ३० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.