Animal : "माझा टॅलेन्टेड बॉब...", 'ॲनिमल' पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी केलं लेकाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 11:39 IST2023-12-04T11:38:36+5:302023-12-04T11:39:42+5:30

'ॲनिमल' पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी लेकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बॉबी देओलचं कौतुक केलं आहे.

dharmendra shared special post for bobby deol after watching animal movie | Animal : "माझा टॅलेन्टेड बॉब...", 'ॲनिमल' पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी केलं लेकाचं कौतुक

Animal : "माझा टॅलेन्टेड बॉब...", 'ॲनिमल' पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी केलं लेकाचं कौतुक

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. टीझरपासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती.  रणबीरचा 'ॲनिमल' प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरल्याचं चित्र आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. 'ॲनिमल'मधील रणबीरने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर बॉबी देओलने त्याच्या अभिनयाने सगळ्यांच्या मनं जिंकून घेतली आहेत. 

'ॲनिमल' पाहिल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी लेकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बॉबी देओलचं कौतुक केलं आहे. धर्मेंद्र यांनी 'ॲनिमल' सिनेमातील बॉबी देओलच्या लूकचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. "माझा टॅलेन्टेड बॉब...", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर बॉबी देओलनेही कमेंट केली आहे. "लव्ह यू पा" अशी कमेंट बॉबीने केली आहे. 

दरम्यान, 'ॲनिमल' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुवांधार बॅटिंग करत आहे. या सिनेमाने तीनच दिवसांत तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे. जवाननंतर तीन दिवसांत २०० कोटींचा आकडा पार करणारा 'ॲनिमल' हा दुसरा सिनेमा ठरला आहे. याबरोबरच या चित्रपटाने पठाण आणि गदर २चा रेकॉर्डही मोडला आहे. 

Web Title: dharmendra shared special post for bobby deol after watching animal movie