धर्मेंद्र यांनी घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट, लखनौत करताहेत 'इक्कीस'चं शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:54 IST2023-11-11T15:53:36+5:302023-11-11T15:54:09+5:30
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) सध्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये त्यांच्या आगामी 'इक्किस' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. यानिमित्ताने धर्मेंद्र यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीचे फोटो समोर आले आहेत.

धर्मेंद्र यांनी घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट, लखनौत करताहेत 'इक्कीस'चं शूटिंग
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) सध्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये त्यांच्या आगामी 'इक्किस' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. यानिमित्ताने धर्मेंद्र यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीचे फोटो समोर आले आहेत. यादरम्यान दोन्ही सेलिब्रिटी एकमेकांशी बोलले आणि हसताना आणि मस्करी करतानाही दिसले. ८७ वर्षीय धर्मेंद्र यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री योगी खूप आनंदी दिसत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धर्मेंद्र यांना भेटही दिली.
धर्मेंद्र सध्या लखनऊमध्ये 'इक्किस' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. शूटिंगसाठी ते पहिल्यांदाच लखनऊला आले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य करणारे बॉलिवूडचे हेमॅन धर्मेंद्र त्यांच्या 'इक्किस' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.
#UPCM@myogiadityanath से आज लखनऊ स्थित सरकारी आवास पर फिल्म अभिनेता श्री धर्मेंद्र जी ने शिष्टाचार भेंट की।@aapkadharampic.twitter.com/V8euI134fS
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) November 11, 2023
'इक्किस'मध्ये झळकणार अमिताभ बच्चन यांचा नातू
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 'इक्किस'मध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन बनवत आहेत. मात्र, अगस्त्य झोया अख्तरच्या 'द आर्चिज' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये सुहाना खान आणि खुशी कपूर देखील दिसणार आहेत.