प्रकाश कौरच्या 'या' एका अटीवर झालं धर्मेंद्र-हेमा मालिनीचं लग्न?; बऱ्याच वर्षाने सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 11:42 AM2024-04-21T11:42:50+5:302024-04-21T11:43:32+5:30

Dharmendra: धर्मेंद्र यांचं प्रकाश कौरसोबत लग्न झालेलं असतांनाही त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला.

dharmendra-first-wife-prakash-kaur-spoke-about-hema-malini-defended-husband-against-womaniser | प्रकाश कौरच्या 'या' एका अटीवर झालं धर्मेंद्र-हेमा मालिनीचं लग्न?; बऱ्याच वर्षाने सत्य आलं समोर

प्रकाश कौरच्या 'या' एका अटीवर झालं धर्मेंद्र-हेमा मालिनीचं लग्न?; बऱ्याच वर्षाने सत्य आलं समोर

बॉलिवूडचा हीमॅन अर्थात अभिनेता धर्मेंद्र (dharmendra) यांनी कलाविश्वाचा एक काळ गाजवला आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. मात्र, त्यांचे सिनेमा जितके चर्चिले गेले त्याच्यापेक्षा कैकपटीने त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली. धर्मेंद्र यांचं प्रकाश कौरसोबत लग्न झालेलं असतांनाही हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला. परंतु, हेमा मालिनीसोबत (hema malini) लग्न करण्यापूर्वी प्रकाश कौरने त्यांच्यासमोर एक अट ठेवल्याचं म्हटलं जातं. या अटीविषयी प्रकाश कौर यांनी नुकतंच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

१०८० मध्ये धर्मेंद्रने धर्म बदलून हेमा मालिनीसोबत लग्नगाठ बांधली. परंतु, हेमा मालिनीसोबत लग्न करण्यापूर्वी त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट दिला नव्हता. परंतु, हेमासोबत लग्न करण्यापूर्वी त्यांना प्रकाश कौरची एक अट मान्य करावी लागली होती. प्रकाश कौरने घातलेल्या या अटीविषयी त्याकाळी पेपरमध्ये बऱ्याच बातम्या छापून आल्या होत्या. याविषयी आता प्रकाशकौर यांनी भाष्य केलं आहे.

काय होती प्रकाश कौर यांची अट?

हेमा मालिनीसोबत लग्न करायचं असेल तर त्याच्या बदल्यात धर्मेंद्र यांना सनी देओलला इंडस्ट्रीत लॉन्च करावं लागेल, अशी अट प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांच्यासमोर ठेवली होती. जर ही अट मान्य असेल तरच ते हेमा मालिनीसोबत लग्न करु शकतात.

प्रकाश कौर यांनी स्टारडस्ट मॅगझीनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हेमा मालिनीविषयी त्यांचं मत मांडलं होतं. तसंच या अटीविषयी देखील त्यांनी खुलासा केला. धर्मेंद्र यांच्यासमोर मी अट ठेवल्याच्या बातम्या होत्या. त्यात काहीही तथ्य नव्हतं. मी अशी कोणतीही अट ठेवली नव्हती. सनी फक्त माझ्या एकटीचा मुलगा नाही तो धर्मेंद्र यांचाही आहे. आणि, मुळात जर मी हेमा मालिनीच्या जागी असते तर असं कधीच केलं नसतं. मी कोणाचं घर, संसार मोडला नसता, असं प्रकाश कौर म्हणाल्या.

दरम्यान, धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला. त्यांना ईशा आणि आहाना देओल या दोन लेकी सुद्धा आहेत. अलिकडेच ईशा देओलने तिच्या पतीपासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यामुळे ईशा मध्यंतरी सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत होती.

Web Title: dharmendra-first-wife-prakash-kaur-spoke-about-hema-malini-defended-husband-against-womaniser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.