प्रकाश कौर आणि हेमा यांच्यानंतर तिसऱ्यांदा प्रेमात पडले होते धर्मेंद्र, २७ वर्षांनी लहान होती अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:44 IST2025-11-11T17:22:00+5:302025-11-11T17:44:43+5:30
ती अभिनेत्री धर्मेंद्र यांच्यापेक्षा तब्बल २७ वर्षांनी लहान होती. अखेर हेमा मालिनी यांना थेट हस्तक्षेप करत दोघांना दूर करावे लागल्याचे बोलले जाते.

प्रकाश कौर आणि हेमा यांच्यानंतर तिसऱ्यांदा प्रेमात पडले होते धर्मेंद्र, २७ वर्षांनी लहान होती अभिनेत्री
बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र (Dharmendra) यांचे अभिनय आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्यासोबतचे त्यांचे नाते सर्वश्रुत आहे. मात्र, त्यांच्या आयुष्यातला एक असा अध्याय आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तो म्हणजे, दोन पत्नी असतानाही धर्मेंद्र तिसऱ्यांदा एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही अभिनेत्री धर्मेंद्र यांच्यापेक्षा तब्बल २७ वर्षांनी लहान होती. या दोघांच्या कथित प्रेमप्रकरणाची गोष्ट जेव्हा हेमा मालिनी यांच्या कानावर आली, तेव्हा त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ आले आणि अखेर हेमा मालिनी यांना थेट हस्तक्षेप करत दोघांना दूर करावे लागल्याचे बोलले जाते.
प्रकाश कौर यांच्याशी विवाहित असूनही धर्मेंद्र यांनी 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांच्याशी थेट धर्म बदलून १९८० मध्ये विवाह केला होता. पण, हेमा मालिनींशी लग्न झाल्यानंतरही धर्मेंद्र यांच्या आयुष्यात एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली होती. ही अभिनेत्री होती अनिता राज (Anita Raaj). धर्मेंद्र आणि अनिता राज यांनी "करिश्मा कुदरत का", "जलजला," आणि "इन्सानियत के दुश्मन" यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. चित्रपटाच्या सेटवर एकत्र काम करत असताना, धर्मेंद्र हे अनिता राजच्या सौंदर्याने इतके मोहित झाले की ते तिच्या प्रेमात पडले, असे त्या काळी म्हटले जात होते.
हेमा मालिनी झाल्या होत्या नाराज, दिला होता इशारा
धर्मेंद्र आणि अनिता राज यांची जवळीक हेमा मालिनी यांना अजिबात आवडली नाही. अनितासोबतच्या धर्मेंद्र यांच्या नात्यामुळे त्या खूप नाराज होत्या. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना अनिता राजपासून दूर राहण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. अनिता राजबद्दल बोलायचे झाल्यास, ती प्रसिद्ध अभिनेता जगदीश राज यांची मुलगी आहे. "करिश्मा कुदरत का" या पहिल्या चित्रपटात काम केल्यानंतर अनितानं १९८६ मध्ये सुनील हिंगोरानी यांच्याशी लग्न केले. चित्रपटानंतर अनितानं 'एक था राजा एक थी रानी' आणि 'छोटी सरदारनी' यांसारख्या टीव्ही मालिकांमधूनही मोठी लोकप्रियता मिळवली. सध्या अनिता 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.