Dhanush parentage case : धनुष आईसोबत पोहोचला न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 16:06 IST2017-03-01T10:36:23+5:302017-03-01T16:06:23+5:30
‘रांझणा’ फेम अभिनेता धनुष सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका तामिळ दांपत्याने धनुष आपलाच हरवलेला ...

Dhanush parentage case : धनुष आईसोबत पोहोचला न्यायालयात
‘ ांझणा’ फेम अभिनेता धनुष सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका तामिळ दांपत्याने धनुष आपलाच हरवलेला मुलगा असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी त्यांनी चक्क न्यायालयात याचिका दाखल करून धनुषकडून ६५ हजार मासिक भत्ता दिला जावा, अशी मागणी केली होती; मात्र धनुषने या दांपत्याचे सर्व दावे फेटाळून लावत मला ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते. चेन्नई उच्च न्यायालयाने धनुषला ‘बर्थ मार्क व्हेरिफिकेशन’साठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तो गेल्या मंगळवारी मदुरई बेंच न्यायालयात आई विजयलक्ष्मीबरोबर हजर झाला होता.
‘द हिंदू’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कातिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी यांना दावा केला होता की, ते धनुषचे बायोलॉजिकल आई-वडील आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाचे स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेटचा उल्लेख करताना म्हटले होते की, धनुषच्या उजव्या कॉलरबोनजवळ एक तीळ आहे. आणि त्याच्या डाव्या बाजूने एक निशाणी आहे. त्यामुळे धनुषच त्यांचा मुलगा कलईचेवलन असून, जो २००२ मध्ये अभिनेता होण्यासाठी चेन्नईला पळून गेला होता. या दांपत्याने यासर्व बाजू न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
![]()
याच दांम्पत्याने धनुष हा आपलाच मुलगा असल्याचा दावा केला आहे.
त्यानुसार गेल्या मंगळवारी धनुष त्याच्या आईबरोबर ‘बर्थमार्क व्हेरिफिकेशन’साठी न्यायालयात पोहोचला होता. यावेळी मदुरई सरकारी राजाजी हॉस्पिटलचे डीन आणि त्यांच्या टीमने धनुषच्या बर्थमार्क्सची तपासणी केली. आता याविषयीचा रिपोर्ट न्यायालयात सादर केला जाणार असून, त्यानंतरच २ मार्च रोजी याविषयीचा निकाल दिला जाणार आहे. दरम्यान याप्रकरणात धनुष सुरुवातीपासूनच सांगत आला आहे की, या दांपत्याने केलेला दावा हा पूर्णत: खोटा आहे. यांच्या हरवलेल्या मुलाशी माझा काहीही संबंध नाही. मला ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.
धनुषकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू आहे. तो तामिळ फिल्म प्रोड्यूसर कस्तुरी राजा यांचा मुलगा असून, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐवर्श्या हिचा पती आहे. धनुष बॉलिवूडमध्ये त्याच्या ‘कोलावेरी डी’ या गाण्यातून चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने सोनम कपूरबरोबर ‘रांझणा’ या सिनेमात काम केले. या सिनेमानंतर तो महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षरा हसन यांच्याबरोबर ‘षमिताभ’मध्येही बघावयास मिळाला होता.
ALSO READ :
- धनुषला चेन्नई उच्च न्यायालयाने ‘या’ कारणासाठी हजर राहण्याचे दिले आदेश
- वृद्ध दांम्पत्याने केला दावा; म्हणे धनुष आमचा पळून गेलेला मुलगा!
- धनुष म्हणतो, ‘ते’ मला ब्लॅकमेल करत आहेत!