हर हर गंगे! 'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले धनुष-क्रिती; गंगा आरतीही केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 08:51 IST2025-11-27T08:44:47+5:302025-11-27T08:51:30+5:30

'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी धनुष आणि क्रिती सेनन वाराणसीत आले होते.

dhanush and kriti sanon attended ganga aarti at varanasi their movie tere ishq mein releasing soon | हर हर गंगे! 'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले धनुष-क्रिती; गंगा आरतीही केली

हर हर गंगे! 'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले धनुष-क्रिती; गंगा आरतीही केली

धनुष आणि क्रिती सेननचा 'तेरे इश्क मे' सिनेमा उद्या २८ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. धनुष आणि आनंद एल राय यांच्याच गाजेलल्या'रांझणा' सिनेमाचीच आठवण चाहत्यांना आली आहे. वाराणसी आणि रांझणा सिनेमाचं जसं कनेक्शन होतं तसंच याही सिनेमाचं आहे. त्यासाठी आनंद एल राय यांच्यासह धनुष आणि क्रिती वाराणसीला आले होते. तिथे त्यांनी गंगा आरतीमध्येही सहभाग घेतला. 

'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी धनुष आणि क्रिती सेनन वाराणसीत होते.  तेथील त्यांचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. धनुष व्हाईट आऊटफिटमध्ये नेगमीप्रमाणेच हँडसम दिसत आहे. त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. तर क्रितीने बिस्कीट कलरचा सुंदर ड्रेस आणि हिरवी ओढणी घेतली आहे. कानात झुमके घातले आहेत. या लूकमध्ये क्रितीचं सौंदर्य खुललं आहे. वाराणसीमध्ये गंगा नदीच्या किनारी ते बसले आहेत. मागे सुंदर नदीचं दृश्य आहे. तर रात्री गंगा आरतीमध्येही दोघांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


धनुष वाराणसीबद्दल म्हणाला, "वाराणसी माझ्यासाठी फक्त एक शहर नाही तर अध्यात्मिक जागृती आहे. मी प्रत्येक गल्ली, प्रत्येक घाट, प्रत्येक मंदिराशी जोडला गेलो आहे. या शहरामुळे माझ्यामध्ये जागृती निर्माण झाली आणि मी स्वत:ला महादेवाच्या चरणी समर्पित केलं." तर क्रिती सेनन म्हणाली, "मी आनंद सरांच्याच दिग्दर्शनाखाली बनलेल्या एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी इथे आले होते. ती जाहिरात कधी रिलीजच झाली नाही पण त्या आठवणी आजही ताज्या आहेत. मी त्यांना वाराणसीतच पहिल्यांदा भेटले होते आणि इथे येऊन मला कायमच शांत वाटतं. मी सरांना सांगितलं होतं की सिनेमाच्या रिलीजआधी मला वाराणसीत जाऊन आशीर्वाद घ्यायचा आहे. आम्ही आज इथे आलो याचा मला आनंद आहे."




धनुषने 'रांझणा'सिनेमातील कुंदनच्या भूमिकेतून सर्वांचं मन जिंकलंत होतं. आता तो शंकरच्या भूमिकेतून पुन्हा प्रेक्षकांना प्रेमात पाडणार आहे. रडायला लावणार आहे. तर यावेळी क्रिती सेननसोबत त्याची जोडी आहे. तिनेही अगदी तोडीस तोड काम केलेलं दिसत आहे. प्रेम, विरह, धोका, बदला अशी एकंदर सिनेमाची कहाणी दिसत आहे. ए आर रहमानने सिनेमासाठी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

Web Title : धनुष और कृति 'तेरे इश्क में' के प्रमोशन के लिए वाराणसी पहुंचे।

Web Summary : धनुष और कृति सेनन ने अपनी आगामी फिल्म 'तेरे इश्क में' का प्रमोशन वाराणसी में किया। उन्होंने गंगा आरती में भाग लिया। आनंद एल राय द्वारा निर्देशित यह फिल्म 'रांझणा' की याद दिला रही है। दोनों अभिनेताओं ने वाराणसी से अपने जुड़ाव को व्यक्त किया।

Web Title : Dhanush and Kriti visit Varanasi for 'Tere Ishk Mein' promotion.

Web Summary : Dhanush and Kriti Sanon promoted their upcoming film 'Tere Ishk Mein' in Varanasi. They participated in the Ganga Aarti. The film, directed by Anand L Rai, is generating buzz, reminding fans of 'Raanjhanaa'. Both actors expressed their connection to Varanasi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.