धनुष आणि ऐश्वर्या आहे इतक्या कोटींची संपत्ती, आकडा वाचून व्हाल थक्क...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 14:05 IST2022-01-18T13:56:23+5:302022-01-18T14:05:08+5:30
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार धनुष (Dhanush)ला कोणत्याच परिचयाची गरज नाही. सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई असण्यासोबतच त्यांची एक वेगळी ओळखही आहे.

धनुष आणि ऐश्वर्या आहे इतक्या कोटींची संपत्ती, आकडा वाचून व्हाल थक्क...
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार धनुष (Dhanush)ला कोणत्याच परिचयाची गरज नाही. सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई असण्यासोबतच त्यांची एक वेगळी ओळखही आहे. धनुषने नुकतीच घटस्फोटाची घोषणा केली आहे, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. लग्नाच्या १८ वर्षानंतर धनुष आणि ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth) विभक्त झाले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील या अतिशय प्रसिद्ध जोडीने 18 वर्षांनंतर वेगळे होण्याचे ठरवले आहे, तर जाणून घ्या या लोकप्रिय जोडप्याच्या नेट वर्थबद्दल.
एकट्या धनुषबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या टॅलेंटच्या जोरावर कोट्यवधींचा मालक बनला आहे. 2020 मध्ये धनुषने 145 कोटी रुपयांची कमाई केली होती. एका रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी धनुषची कमाई 20 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच 142 कोटी रुपये होती. तर, एबीपीच्या वृत्तानुसार, त्यांची एकूण संपत्ती 160 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, धनुष एका चित्रपटासाठी सात ते आठ कोटी रुपये घेतो. याशिवाय तो जाहिराती आणि इतर गोष्टींमधूनही कमाई करतो.
तो चेन्नईच्या पॉश भागात एका आलिशान बंगल्यात राहतो. या बंगल्याची किंमत 20 ते 25 कोटींच्या आसपास आहे. आतापर्यंत धनुष पत्नी ऐश्वर्या आणि दोन मुलांसह या बंगल्यात राहत होता. याशिवाय धनुष डॉक्टरसुद्धा आहे.
ऐश्वर्या रजनीकांतनेही कोट्यवधींची कमाई केली आहे. गायिका ऐश्वर्या एका वर्षात 7 ते 35 कोटी कमावते. अंदाज लावला तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ही प्रसिद्ध जोडी एका वर्षात 145 कोटी रुपये कमावते. अभिनयासोबतच धनुषने दिग्दर्शक, पार्श्वगायक आणि निर्माता म्हणूनही स्वतःला सिद्ध केले आहे. याशिवाय या जोडीने वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मोठ्या मालमत्तांमध्येही गुंतवणूक केली आहे.