‘टीम बाघी’चा पाणीसंरक्षणाचा निश्चय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 09:23 IST2016-04-09T16:23:38+5:302016-04-09T09:23:38+5:30

सध्या कोरडा दुष्काळ असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नैसर्गिक स्त्रोत कधीही संपू नयेत आणि सातत्याने पाण्याचा ...

Determination of water conservation of 'Team Tiger' | ‘टीम बाघी’चा पाणीसंरक्षणाचा निश्चय

‘टीम बाघी’चा पाणीसंरक्षणाचा निश्चय

्या कोरडा दुष्काळ असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नैसर्गिक स्त्रोत कधीही संपू नयेत आणि सातत्याने पाण्याचा वर्षाव होत रहावा या एकाच उद्देशाने ‘बाघी’ चित्रपटाची टीम प्रेरित झाली होती.

चित्रपटाच्या दरम्यान टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्यातील अनेक रोमँटिक सीन्स पावसातील आहेत. त्यावेळी टीमने निश्चय केला की, जास्तीत जास्त पावसातील सीन्स हे नैसर्गिकपणे पाऊस आल्यानंतरच शूट करावयाचे आहेत.

निर्माता साजिद नादियाडवाला आणि दिग्दर्शक साबिर खान हे याबाबतीत अत्यंत लक्षपूर्वक निर्णय घेत होते. त्यांनी टीमला तशा सुचना दिल्या होत्या की, पाण्याचा एक थेंबही वाया जायला नको आहे. चित्रपटाची शूटिंग केरळ आणि मान्सून ऋतुमध्ये नियोजित करण्यात आली होती.

एकवेळ जास्त दिवस शूटिंग सुरू राहिली तरी चालेल पण नैसर्गिक पाण्यातच जास्त शूटिंग व्हावी अशी टीम बाघीची इच्छा होती. त्यामुळे चित्रपटातील पावसाच्या सीन्सला जास्तीच विश्वासार्हता आलेली आहे. 

shraddha

Web Title: Determination of water conservation of 'Team Tiger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.