​‘या’ व्यक्तिमुळे नर्व्हस असूनही रेखाला मीडियापुढे यावे लागले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 15:06 IST2017-10-20T09:36:40+5:302017-10-20T15:06:40+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा मीडियाला कायम टाळते. ती मीडियासोबत बोलतच नाही. एकट्यातही नाही आणि गर्दीतही नाही. अलीकडच्या काही वर्षांत तर ...

Despite this 'man' Narvus, Rekha had to come forward to the media! | ​‘या’ व्यक्तिमुळे नर्व्हस असूनही रेखाला मीडियापुढे यावे लागले!

​‘या’ व्यक्तिमुळे नर्व्हस असूनही रेखाला मीडियापुढे यावे लागले!

येष्ठ अभिनेत्री रेखा मीडियाला कायम टाळते. ती मीडियासोबत बोलतच नाही. एकट्यातही नाही आणि गर्दीतही नाही. अलीकडच्या काही वर्षांत तर रेखाने मीडियासोबत बोलणे जवळपास बंद केले आहे. पण काल-परवा असे काही झाले की, नर्व्हस असूनही रेखाला मीडियासोबत बोलावे लागले. याचे कारण काय तर आमिर खान.

होय, केवळ आणि केवळ आमिर खानमुळे रेखाला मीडियासमोर जावे लागले. म्हणजेच मीडियाशी बोलण्याशिवाय रेखाला राहावले नाही. होय, आमिरचा ‘सीके्रट सुपरस्टार’ रेखाने पाहिला आणि ती स्वत:ला रोखू शकली नाही. मीडियाशी बोलायला ती स्वत:हून समोर आली.



‘ मला अवार्ड्सबद्दल काहीही ठाऊक नाही. पण आमिरने आज मला एक मोठा अवार्ड दिला आहे. अवार्ड्स काय असतो तर प्रेम आणि आशीर्वाद असतो. हेच मला आमिरने आज दिलेय. मी पहिल्यांदा त्याला भेटले तेव्हाही त्याने ते दिले होते. त्याने दिलेले प्रेम आणि आदर आयुष्यभर माझ्यासोबत असेल. यासाठी धन्यवाद.  सुखी राहा. आज मी पहिल्यांदा बोलतेय. नर्व्हस आहे. मला माफ कराल. आमिरच्या अभिनयाचे कौतुक करणे म्हणजे,‘सूरज को दीया दिखाने जैसा है’,असे रेखा म्हणाली. ती ‘सीके्रट सुपरस्टार’बद्दल बोलत होती. रेखा इतके बोलली आणि तिने आपला हात आमिरच्या डोक्यावर ठेवला आणि दोन्ही हात जोडून त्याला प्रणाम केला.



रेखा कमालीची भावूक आहे. अनेकदा ती भावूक होते. आमिरचा ‘सीके्रट सुपरस्टार’ पाहिल्यानंतरही ती अशीच भावूक झालेली दिसली.  यापूर्वी ‘दंगल’ या चित्रपटावेळी रेखाने आमिर खानला एक पत्र लिहिले होते; पत्र वाचून आमिर इतका इमोशनल झाला होता की, त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. या पत्राविषयी मीडियामध्ये बोलताना आमिरने म्हटले होते की, ‘हे पत्र मी कायम माझ्याजवळ ठेवणार आहे. पत्रात चित्रपटाचे कौतुक केले म्हणून नव्हे तर हे पत्र माझ्यासाठी सर्वोत्तम आहे.’  दंगलच्या सक्सेस पार्टीतही रेखा पोहोचली होती.

Web Title: Despite this 'man' Narvus, Rekha had to come forward to the media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.