डिंपलसह लग्न झाल्याचे माहित असूनही राजेश खन्नासह लिव इनमध्ये राहत होती ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 15:48 IST2017-10-25T10:16:45+5:302017-10-25T15:48:34+5:30

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आपल्या चॉकलेट इमेज आणि लव्हर ब्वॉय चार्ममुळं चित्रपटरसिकांना वेड लावलं... रुपेरी पडद्यावर प्रेम तसंच ...

Despite knowing that Dimple got married, the actress was staying in Live Inn with Rajesh Khanna | डिंपलसह लग्न झाल्याचे माहित असूनही राजेश खन्नासह लिव इनमध्ये राहत होती ही अभिनेत्री

डिंपलसह लग्न झाल्याचे माहित असूनही राजेश खन्नासह लिव इनमध्ये राहत होती ही अभिनेत्री

लिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आपल्या चॉकलेट इमेज आणि लव्हर ब्वॉय चार्ममुळं चित्रपटरसिकांना वेड लावलं... रुपेरी पडद्यावर प्रेम तसंच विरहगाथा त्यांनी कधी हसवत तर कधी डोळ्यात आसवं आणत निभावल्या आणि इतिहास रचला.....त्याकाळातल्या अनेक अभिनेत्रींशी राजेश खन्ना यांची सिनेमात जोडी जमली...त्याकाळी रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये राजेश खन्ना यांचं नाव अनेक अभिनेत्रींशीही जोडलं गेलं..  यांत अभिनेत्री टीना मुनिमचंही नाव होतं. राजेश खन्ना आणि टीना मुनिम या जोडीनं एकाहून एक सरस सिनेमा दिले. सौतन सिनेमाच्यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढु लागली.दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही.टीना मुनिमही दोघांच्या या नात्याला घेवून खूप सीरियस होते.दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते.टीनाला त्यांच्याशी लग्न करायचे होते. अनेकदा टीनाने राजेश खन्ना यांना ही गोष्ट सांगितली,मात्र राजेश खन्ना या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष केले.टीना मुनिमला राजेश खन्नाच्या अशा वागण्याचा संताप येत होता.त्यामुळे तिनेही त्यांच्याशी लांबच राहण्याचा  प्रयत्न केला.मात्र त्यावेळी राजेश खन्ना वारंवार डिंपलला तलाक दिल्यानंतर टीनाशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.दोघांचेही अफेअर सुरू असताना  राजेश खन्ना यांनी डिंपलला एकदाही तलाक देणार असल्याचे सांगितले नव्हते.त्यामुळे राजेश खन्नाकडून वारंवार मिळणा-या त्या कारणांमुळे हैरान होवून टीना मुनिमने राजेश खन्नासह ब्रेक करत दूर जाणेच पसंत केले. राजेश खन्नाला टीना आवडायची त्यामुळे तिला खूप समजवण्याचाही त्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जाते.मात्र तेव्हा राजेश खन्नावर आता काडीमात्र भरोसा नसल्याचे सांगत राजेश खन्ना यांच्या आयुष्यातून टीना मुनिमने निघून जाणेच पसंत केले.
राजेश खन्ना आणि टीना मुनिम यांची ‘सुराग’, ‘सौतन’, ‘अलग-अलग’, ‘आखिर क्यों, ‘अधिकार’ यासारख्या सिनेमात झळकले आहेत. त्यावेळी सिनेमातल्या या दोघांची केमिस्ट्रीही रसिकांनी खूप पसंत केली होती.टीना मुनिमसह ब्रेक अप झाल्यानंतरही राजेश खन्ना यांनी डिंपलला तलाक दिला नसला तरीही ते डिंपलसह काही वर्षच एकत्र राहिले होते.



अहमदाबादच्या एका कार्यक्रमात  डिंपल कपाडियाची भेट  राजेश खन्नासह झाली.खरंतर डिंपल यांना पाहताच डिंपलवर राजेश खन्ना फिदा झाले...डिंपल त्यांवेळी 15 वर्षाची होती.. दोघांच्या वयात 15 वर्षाहून अधिकचं अंतर होतं.. मात्र प्रेमात सारं काही माफ असतं असं म्हणतात..डिंपलच्या वडिलांनाही लेकीच्या निवडीवर सार्थ अभिमान होता... 1973 साली दोघंही रेशीमगाठीत अडकले होते.

Web Title: Despite knowing that Dimple got married, the actress was staying in Live Inn with Rajesh Khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.