एका चाहतीने केली अशी मागणी की, गुरमीतही लाजला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 17:42 IST2016-11-11T17:42:44+5:302016-11-11T17:42:44+5:30
गुरमीत चौधरी आणि सना खान यांचा ‘वजह तुम हो’ या आगामी चित्रपटातील हॉट दृश्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. थंडीच्या दिवसात या दृश्यांनी जणू आग लावली आहे. इतकी की, गुरमीतच्या फिमेल फॅन्सला यामुळे संयम राखणे कठीण जातेय.

एका चाहतीने केली अशी मागणी की, गुरमीतही लाजला!
ग रमीत चौधरी आणि सना खान यांचा ‘वजह तुम हो’ या आगामी चित्रपटातील हॉट दृश्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. थंडीच्या दिवसात या दृश्यांनी जणू आग लावली आहे. इतकी की, गुरमीतच्या फिमेल फॅन्सला यामुळे संयम राखणे कठीण जातेय. त्यामुळे त्या गुरमीतकडे चित्र-विचित्र मागण्या करू लागल्या आहेत. होय, आधी स्टार्स भेटायचे तेव्हा त्यांचा आॅटोग्राफ घेतला जायचा. पण आता सेल्फीचा बोलबाला आहे. अलीकडे गुरमीत त्याची बेटर हाफ देबीनासोबत गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. या ठिकाणी एका चाहतीने गुरमीतकडे सेल्फीसोबतच अशी काहीमागणी केली की, ती ऐकून खुद्द गुरमीतलाही लाजायला झाले. होय, गुरमीत व देबीना गोव्यातील एका क्लबमध्ये एन्जॉय करत असतानाच, ही फीमेल फॅन गुरमीतजवळ आली आणि सेल्फीची मागणी करू लागली. गुरमीतही तिच्यासोबत सेल्फीसाठी तयार झाला. पण अचानक या चाहतीने गुरमीतकडे ‘स्ट्रिपटीज’ची मागणी करून टाकली. तिची ही काहीशी अश्लिल मागणी पाहून काही क्षण गुरमीतही ओशाळला. कारण देबीनाही त्याच्यासोबत होती. पण असे असूनही गुरमीतने संयम राखला. चाहतीच्या भावना लक्षात घेत, त्याने तिच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
‘वजह तुम हो’मध्ये गुरमीत व सना खानने कधी नव्हे इतके बोल्ड सीन दिले आहे. चित्रपटाचे ट्रेलर पाहून गुरमीत रिअल लाईफमध्येही अशाच रंगेल असेल, असे चाहत्यांना वाटू शकेल. पण पडद्यावर दिसणारे सगळेच सत्य नसते. पण गुरमीतकडे ‘स्ट्रिपटीज’ची मागणी करणाºया ‘त्या’ चाहतीला हे कोण बरे समजावेल?