दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल यांनी मिस्टर अॅण्ड मिसेस चढ्ढा यांना दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 14:42 IST2023-09-25T14:31:35+5:302023-09-25T14:42:31+5:30
Parineeti-Raghav Wedding : अरविंद केजरीवाल यांनीही परिणीती आणि राघव या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल यांनी मिस्टर अॅण्ड मिसेस चढ्ढा यांना दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आप खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकली. रविवारी(२४ सप्टेंबर) उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांनी सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी परिणीती आणि राघव यांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही परिणीती आणि राघव या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नानंतर राघव चड्ढा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन विवाहसोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. राघव चड्ढा यांचं हे ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी शेअर केलं आहे. "देव तुम्हाला सुखी ठेवो...लग्नाच्या शुभेच्छा", असं केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
God bless u both a very happy married life… https://t.co/ILZ3blzmbV
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 25, 2023
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज ते दोघेही उदयपूरहून निघणार आहेत. दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी परिणीती आणि राघव चड्ढा यांचं वेडिंग रिसेप्शन असणार आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर राजकीय मंडळीही उपस्थित असणार आहेत.