‘या’ चित्रपटांनी बदलली अपंगत्वाची व्याख्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 16:06 IST2017-03-11T10:36:31+5:302017-03-11T16:06:31+5:30

अबोली कुलकर्णी हिंदी चित्रपटसृष्टीत आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी अपंग व्यक्तींच्या भूमिका साकारल्या. भूमिकांचा दुबळेपणा आणि सहानुभूतीपूर्ण कथानक अशा प्रकारचे चित्र ...

Definition of 'These' films' Disability! | ‘या’ चित्रपटांनी बदलली अपंगत्वाची व्याख्या!

‘या’ चित्रपटांनी बदलली अपंगत्वाची व्याख्या!

ong>अबोली कुलकर्णी

हिंदी चित्रपटसृष्टीत आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी अपंग व्यक्तींच्या भूमिका साकारल्या. भूमिकांचा दुबळेपणा आणि सहानुभूतीपूर्ण कथानक अशा प्रकारचे चित्र आजतागायत पडद्यावर चित्रीत करण्यात आले आहे. त्यांच्या आयुष्यातील दु:खी क्षण, त्यांचा खडतर प्रवास असेच काहीसे चित्रण चित्रपटांमध्ये दाखवण्यात आले. मात्र, बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांच्यामुळे अपंग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. त्यांनी त्यांच्या अपंगत्वावर मात करून आनंदी आणि सुखी जीवन जगण्याचा संदेशच जणू प्रेक्षकांना या चित्रपटांच्या माध्यमातून दिला. कणखर, खंबीर, बिनधास्त आणि तितक्याच ताकदीच्या भूमिका कलाकारांनी चित्रपटांमध्ये साकारल्या. पाहूयात, कुठले आहेत हे चित्रपट आणि कोणत्या भूमिका...

मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ 
 हटके आणि आव्हानात्मक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलिन. ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ या शोनाली बोस दिग्दर्शित चित्रपटात तिने ‘लैला’ या मुख्य पात्राची भूमिका साकारली आहे. सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासलेल्या युवतीची भूमिका तिने साकारलीय. तिला तिच्या आॅफिसमध्ये खुप सहानुभूतीची वागणूक मिळत असते. पण, तिला ते नको असते. तिच्या व्यक्तीरेखेतून ती दाखवून देते की, ‘अपंगांना स्पेशल ट्रीटमेंटची गरज नसते. त्यांनाही सर्वसामान्यांप्रमाणे वागणूक दिली गेली पाहिजे.’



कोशिश :
 संजीव कुमार आणि जया भादुरी या मुकबधीर दाम्पत्याचे जीवन ‘कोशिश’ या १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रीत करण्यात आले आहे.  हरी आणि आरती हे दोघे एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि प्रेमात पडतात. त्यांच्या मुलाला ते सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण देतात.  त्यांचा रोजच्या जीवनातील संघर्ष, दु:ख, झगडा या माध्यमातून जीवनप्रवास दाखवण्यात आलाय. त्यांच्या या झगड्यात त्यांनी कधीही त्यांच्या अपंगत्वाचे कारण पुढे केलेले नसते. आयुष्यात कितीही मोठे वादळ आले तरीही न डगमगता अढळ क से राहायचे? हे यातून दाखवण्यात आले आहे.
 
                                      

स्पर्श 
अंध अनिरूद्ध परमार (नसिरूद्दीन शाह) आणि डोळस कविता (शबाना आझमी) यांच्यातील प्रेमकहानी ‘स्पर्श’ या १९८० यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अंध मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकाची भूमिका नसिरूद्दीन शाहने केली आहे. कविताला जेव्हा अनिरूद्धच्या त्याच्यावरील प्रेमाबद्दल कळते. तेव्हा त्या दोघांनाही प्रेमाचा स्पर्श होतो. अंधत्वावर मात करणारं हे जोडपं प्रेक्षकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 

      

सदमा :
 श्रीदेवी आणि कमल हसन यांचा सर्वाेत्कृष्ट चित्रपट कोणता? असा विचार केला तर ‘सदमा’ या चित्रपटाचे नाव ओठी येते. बालू महेंद्र दिग्दर्शित या चित्रपटात कार अपघातात स्मृती गेलेल्या एका तरूणी नेहलताची (श्रीदेवी) कहानी मांडली आहे. तिच्या आयुष्यात आलेला सोमू (कमल हसन) शिक्षक तिच्या प्रेमात पडतो. विस्मृतीवर मात करून ते दोघे एकमेकांसोबत एक सुखी आयुष्य जगू लागतात. लहान मुलीच्या विश्वात रमणारी नेहलता मानसिकदृष्ट्या स्वत:ला किती स्ट्राँग बनवते या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी कमल हसन याला नॅशनल अवॉर्ड देण्यात आला आहे.

                   

 खामोशी 
 संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘खामोशी’ (१९९६) या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये संगीत, अभिनय या क्षेत्रात आगळावेगळा ठसा उमटवला. नाना पाटेकर, मनिषा कोईराला, सलमान खान, सीमा बिस्वास आणि हेलन यांच्या भूमिकेतील या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर उत्तम गल्ला जमवला. यात  जोसेफ (नाना पाटेकर), फ्लेवी ब्रॅगांझा (सीमा बिस्वास) यांनी मुकबधीर जोडप्याची भूमिका साकारली आहे. त्यांची मुलगी अ‍ॅनी (मनिषा कोईराला) ही तरी मुकबधीर म्हणून जन्माला येऊ नये म्हणून ते प्रयत्न करतात. त्यात ते यशस्वीही होतात. त्यांनी साकारलेलं हे जोडपं पडद्यावर कुठल्याही दृष्टीने कमजोर वाटत नाही. 



इकबाल 
 नागेश कुकूनूर्स ‘इक्बाल’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे याने मुकबधीर युवकाची भूमिका केली आहे. शेतकºयाच्या मुलाचा अभिनय त्याने केला आहे. मुकबधीर असूनही तो उत्तम क्रिकेट खेळत असतो. प्रशिक्षक नसिरुद्दीन शाह याच्याकडून तो ट्रेनिंग घेतो आणि भारतीय क्रिकेट टीमचा उत्कृष्ट खेळाडू बनतो. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या मुकबधीर युवकाचा उत्तम अभिनय त्याने केला आहे. 


 

Web Title: Definition of 'These' films' Disability!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.