​‘पद्मावती’च्या भूमिकेसाठी दीपिकाने १२ कोटी घेतल्याची अफवा- भन्साळी !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 14:42 IST2016-08-31T09:12:50+5:302016-08-31T14:42:50+5:30

संजय लिला भन्साळी दिग्दर्शित आगामी ‘पद्मावती’ चित्रपटासाठी दीपिका १२ कोटी रुपये एवढे मानधन घेणार असल्याची चर्चा सिनेक्षेत्रात रंगली होती. ...

Deepika's rumor has taken 12 crore for Padmavati's role. | ​‘पद्मावती’च्या भूमिकेसाठी दीपिकाने १२ कोटी घेतल्याची अफवा- भन्साळी !!

​‘पद्मावती’च्या भूमिकेसाठी दीपिकाने १२ कोटी घेतल्याची अफवा- भन्साळी !!


/>संजय लिला भन्साळी दिग्दर्शित आगामी ‘पद्मावती’ चित्रपटासाठी दीपिका १२ कोटी रुपये एवढे मानधन घेणार असल्याची चर्चा सिनेक्षेत्रात रंगली होती. हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणचं मानधन वाढणं स्वाभाविक आहे. मात्र ही चर्चा निराधार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या बिगबजेट ‘पद्मावती’ सिनेमात अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पुन्हा एकदा दिसणार आहेत. या सिनेमासाठी दीपिकाने हॉलिवूड सिनेमाप्रमाणेच जास्तीचं मानधन घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र भन्साळी यांच्या प्रवक्त्यांनी या केवळ अफवा असून त्यामध्ये कसलंही सत्य नसल्याचं सांगितलं.
दीपिका रणवीरने यापूर्वी भन्साळींसोबत गलियो की लीला: रामलीला, बाजीराव मस्तानी या सुपरहीट सिनेमात काम केलं आहे. मात्र दीपिकाने हॉलिवूडच्या या सिनेमात काम केल्यानंतर मानधन वाढवलं असल्याची चर्चा होती. यावर भन्साळींकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Web Title: Deepika's rumor has taken 12 crore for Padmavati's role.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.