दीपिकाचे नव्याने हसणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 17:28 IST2016-07-02T11:52:24+5:302016-07-02T17:28:25+5:30

तुम्हाला जवानी दिवानीमधील दीपिकाचा फोटो आठवतोय का? तीन वर्षापूर्वी हा चित्रपट आला होता. दीपिकाच्या फॅन क्लबने तिचा हा फोटो ...

Deepika's new smile! | दीपिकाचे नव्याने हसणे!

दीपिकाचे नव्याने हसणे!

म्हाला जवानी दिवानीमधील दीपिकाचा फोटो आठवतोय का? तीन वर्षापूर्वी हा चित्रपट आला होता. दीपिकाच्या फॅन क्लबने तिचा हा फोटो शेअर केला. 
दीपिका ही अत्यंत कमी बोलणारी आणि लाजरी दिल्लीची नैना नावाची मुलगी असते. कबीर अर्थात बनीच्या प्रेमात पडते. तिचा जुना बॉयफ्रेंड रणबीर कपूरने ही भूमिका केली होती. 
या चित्रात दीपिकाच्या भोवती असणारी हिरवळ तिच्या गालावरील हास्याप्रमाणेच सुंदर आहे. बनी नैनाला म्हणतो, अगर मेरे पास दिल होता ना, तो तेरी स्माईल पे पक्का आ जाता’
आणखी एका चित्रात दीपिका आपली सहकलाकार कल्की कोचेलिन आणि आदित्य रॉय कपूरसोबत ट्रेकिंग करताना दिसते आहे. या चित्रपटात दीपिका, रणबीर, कल्की आणि आदित्य मनालीमधील ट्रीप एन्जॉय करताना दिसत आहेत.
ये जवानी है दिवानी हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. २०१३ साली हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला. या चित्रपटात कुणाल रॉय कपूर, तन्वी आझमी आणि दिवंगत फारुख शेख यांनी काम केले होते.

Web Title: Deepika's new smile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.