'या' हॉटेलमध्ये दीपिका पादुकोणच्या नावाने मिळते ही खास डिश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 18:55 IST2020-05-02T18:55:00+5:302020-05-02T18:55:02+5:30

काही दिवसांपूर्वी दीपिका तिच्या ‘महानती’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती

Deepika, a special dish in this famous hotel gda | 'या' हॉटेलमध्ये दीपिका पादुकोणच्या नावाने मिळते ही खास डिश!

'या' हॉटेलमध्ये दीपिका पादुकोणच्या नावाने मिळते ही खास डिश!

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची आज आघाडीची अभिनेत्री आहे. एकापेक्षा एक हीट सिनेमा दीपिकाने बॉलिवूडला दिले आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये दीपिका पती रणवीर सिंगसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. अमेरिकेतल्या टेक्ससमध्ये दीपिकाचे नाव एका डोशाला देण्यात आले आहे. वर्षाच्या सुरुवातील सोशल  मीडियावर दीपिकाने या हॉटेलचे मेन्यूकार्ड शेअर केले होते. तुम्हाला दीपिकाच्या नावाचा डोसा खायचा असेल तर तब्बल 10 डॉलर मोजावे लागलीत.

सध्या दीपिका रणवीर सोबत मुंबईमध्ये असून लॉकडाऊनध्ये ती तिच्या आई-बाबांना खूप मिस करत आहे. त्यामुळे हे सर्व संपल्यावर ती सर्वात आधी आपल्या आई-वडीलांची भेट घेणार आहे. त्यानंतर ती शगुन बात्राच्या सिनेमा ‘इंटर्न’च्या तयारीला सुरुवात करेल. हा २०१५ मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या ‘इंटर्न’ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

काही दिवसांपूर्वी दीपिका तिच्या ‘महानती’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांना एका प्रोजेक्टमध्ये दीपिकाला प्रभासच्या अपोझिट कास्ट करण्याची इच्छा आहे. पण तूर्तास दीपिकाने या प्रोजेक्टसाठी मागितलेला मानधनाचा आकडा पाहून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती अशी चर्चा रंगली होती.निर्माता अश्विनी दत्त हा सिनेमा प्रोड्यूस करत आहेत. या बिग बजेट सिनेमाचे शूटींग पुढील वर्षी सुरु होणार आहे. दीपिका या चित्रपटात दिसली तर प्रभास व तिची जोडी प्रेक्षकांसाठी एक खास ट्रिट असणार आहे.

Web Title: Deepika, a special dish in this famous hotel gda