दीपिका म्हणते, तरच करेल सलमानसोबत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 16:58 IST2016-04-20T11:28:04+5:302016-04-20T16:58:04+5:30
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी चित्रपटात एकत्रितपणे काम करणार असल्याची चर्चा आहे. कबीर ...

दीपिका म्हणते, तरच करेल सलमानसोबत काम
अ िनेता सलमान खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी चित्रपटात एकत्रितपणे काम करणार असल्याची चर्चा आहे. कबीर खानने तूर्तास हा केवळ प्रसारमाध्यमांचा तर्क असल्याचे सांगून ही चर्चा उघडवून लावली असली तरी आमच्या अधिकृत घोषणेपर्यंत प्रतीक्षा करा, असे सूचक विधानही केले आहे. त्यामुळेच सलमान-दीपू एकत्र दिसण्याच्या चर्चांना वेग आला आहे. तशी एक नवी चर्चाही आमच्या कानावर आली आहे, ती म्हणजे दीपिकाने या चित्रपटासाठी एक अट ठेवलीय. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील बहुतांश चित्रपट तिने स्वत:च्या जोरावर यशस्वी केलेले आहे. याऊलट सलमानचे चित्रपट हे पूर्णत: नायकप्रधान असतात. अशास्थितीत कबीरच्या चित्रपटात सलमानपुढे आपण केवळ शोभेची बाहुली बनून राहू, अशी भीती दीपिकाला बहुधा वाटत असावी. त्याचमुळे तिने कबीर खानपुढे अट ठेवली आहे. या चित्रपटात काम करेल पण सलमानसोबतच माझीही भूमिका तोलामोलाची असावी, अशी तिची अट आहे. मी केवळ शोभेची बाहुली म्हणून कुठलीही फुटकळ भूमिका करणार नाही,असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे. आता कबीर खान दीपूची ही अट मान्य करतो की नाही, ते बघूच!!