साखरपुडा न करताच परतले दीपिका-रणवीर, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 21:47 IST2018-01-06T16:17:23+5:302018-01-06T21:47:23+5:30

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता रणवीर कपूर मुंबईत परतले असून, नुकतेच दोघांचे मुंबई विमानतळावरील काही फोटोज् ...

Deepika-Ranveer returns to the film without looking forward, see photo! | साखरपुडा न करताच परतले दीपिका-रणवीर, पाहा फोटो!

साखरपुडा न करताच परतले दीपिका-रणवीर, पाहा फोटो!

लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता रणवीर कपूर मुंबईत परतले असून, नुकतेच दोघांचे मुंबई विमानतळावरील काही फोटोज् समोर आले आहेत. रणवीर गर्लफ्रेंड दीपिकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीव येथे गेला होता. वाढदिवशीच दिवशीच दोघे साखरपुडा करणार असल्याची चर्चा रंगली होती. गेल्या ५ जानेवारी रोजी दीपिकाने तिचा वाढदिवस साजरा केला. दोघेही मालदीव येथे गेल्याने त्यांच्या साखरपुड्याची चर्चा वाºयासारखी पसरली होती. विरूष्काप्रमाणेच हे दोघे अतिशय सीक्रेट पद्धतीने साखरपुडा करणार असल्याचे निश्चित मानले जात होते. परंतु हे दोघे साखरपुडा न करताच परतले आहे. मात्र विमानतळावरून एकत्र येताना या दोघांनी त्यांच्यातील नाते अजूनही दृढ असल्याचे दाखवून दिले आहे. 



मुंबई विमानतळावर जेव्हा हे दोघे स्पॉट झाले, तेव्हा त्यांच्या चेहºयावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. त्याचबरोबर साखरपुडा केला नसला तरी, त्यांच्यातील नाते कायम असल्याचेही त्यांनी संकेत दिले. मधल्या काळात दोघांच्या नात्यात दरार निर्माण झाल्याची चर्चा होते. काही मतभेदांमुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात होते. मात्र ज्या पद्धतीने हे दोघे एकत्र बघावयास मिळाले त्यावरून अजूनही ते रिलेशनशिपमध्ये असावेत, असे दिसून येत आहे. 





दरम्यान, दोघेही आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात झळकणार आहेत. सध्या त्यांचा हा चित्रपट प्रचंड वादाच्या भोवºयात सापडला असून, तो केव्हा रिलीज होईल याविषयी अजूनही साशंकता आहे. चित्रपटात दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली आहे. तर रणवीर अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला राजपूत संघटनांकडून सातत्याने विरोध होत आहे. काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासही राजपूत संघटनांकडून विरोध होत आहे. 

Web Title: Deepika-Ranveer returns to the film without looking forward, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.