दीपिका-रणवीरची लेक दुआला मिळालं हे खास टोपणनाव, मावशीच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:42 IST2025-10-22T16:39:14+5:302025-10-22T16:42:19+5:30
दीपिका - रणवीरच्या लेकीला तिच्या मावशीने खास टोपणनाव ठेवलंय. त्यामुळे सर्वांनी क्यूट प्रतिक्रिया दिल्या आहेत

दीपिका-रणवीरची लेक दुआला मिळालं हे खास टोपणनाव, मावशीच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांची मुलगी दुआचा चेहरा चाहत्यांना दाखवून एक गोड सरप्राईज दिलं. या आनंदाच्या क्षणात दीपिकाची धाकटी बहीण आणि दुआची मावशी अनिशा पादुकोण हिने भाचीसाठी तिचं प्रेम व्यक्त करत एक खास कमेंट केली. ही कमेंट चांगलीच चर्चेत ठरली असून दुआच्या टोपणानावाने सर्वांचं लक्ष वेधलंय.
दीपिका-रणवीरच्या लेकीला मावशी काय म्हणते?
दीपिका-रणवीरने सोशल मीडियावर आपल्या लाडक्या लेकीचे फोटो शेअर करताच चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आलिया भट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींनी दुआला भरभरून प्रेम दिले. मात्र, या सगळ्यामध्ये दीपिकाची बहीण अनिशा पादुकोणची कमेंट विशेष लक्ष वेधून घेत आहे. अनिशाने आपल्या भाचीसाठी लिहिलं की, "माझ्या हृदयाचा छोटासा तुकडा, माझी टिंगू". अनिशाने दिलेल्या 'टिंगू' या क्यूट टोपणनावाने चाहत्यांना खूप आनंद झाला असून, त्यांनी यावर 'किती गोड' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रणवीर आणि दीपिकाने २०१८ मध्ये लग्न केलं आणि ८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या घरी मुलीचं आगमन झालं. त्यांनी लेकीचं नाव 'दुआ' ठेवलं. या नावाचा अर्थ 'प्रार्थना' असा आहे. आता दुआच्या मावशीने भाचीसाठी 'टिंगू' हे गोड टोपणनाव ठेवलं आहे. काल दिवाळीनिमित्त दीपिका आणि रणवीरने दुआचा क्यूट फोटो शेअर केल्याने या दोघांच्या चाहत्यांसाठी हा खरोखरच एक संस्मरणीय क्षण ठरला आहे. सर्वांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.