n style="color: rgb(70, 70, 70); font-family: 'arial unicode ms', sans-serif; font-size: 16px; line-height: 26px;">बॉलिवूड मध्ये एकापाठोपाठ नऊ बॉक्स ऑफिस हिट फिल्म्स दिल्यानंतर दीपिका पदुकोण आता हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झालीये. विन डिझेल या प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्यासोबत ती 'ट्रिपल एक्स - द रीटर्न ऑफ क्सँडर केज' हा आपला चित्रपट करणार आहे.
दीपिकाने याबद्दल काही सांगितलं नसलं तरी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती पुढचे दोन महिने कॅनडालाच राहणार असल्याची माहिती मिळतेय. या चित्रपटासाठी दीपिका विशेष मेहनत घेताना दिसतेय. त्यासाठी ती दररोज भरपूर वेळ जिममध्येही घालवत आहे, अशीही माहिती आहे. यास्मिन कराचीवालाच्या मार्गदर्शनाखाली ती जिमवर्क करतेय. ती दिवसातून तीन वेळा जिमला जाते. जिममध्ये ती दररोज भरपूर वजन उचलते, डंबेल्सने व्यायम करते. या चित्रपटात तिला अॅक्शन सीन्स करायचे आहेत. त्यासाठी हे सर्व करणे तिच्यासाठी आवश्यक आहे.Web Title: Deepika plays such a hard work for her first Hollywood movie
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.