दीपिका पादुकोणच्या बहिणीचा खुलासा; चार वर्षांपूर्वीच झाला दीपिकाचा साखरपुडा, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 15:52 IST2018-01-26T10:22:20+5:302018-01-26T15:52:29+5:30

दीपिका पादुकोण आणि तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग लग्नाच्या बंधनात केव्हा अडकतील याबाबतची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

Deepika Padukone's sister reveals; Deepika's four years ago, watch the video! | दीपिका पादुकोणच्या बहिणीचा खुलासा; चार वर्षांपूर्वीच झाला दीपिकाचा साखरपुडा, पाहा व्हिडीओ!

दीपिका पादुकोणच्या बहिणीचा खुलासा; चार वर्षांपूर्वीच झाला दीपिकाचा साखरपुडा, पाहा व्हिडीओ!

िनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नानंतर आता चाहत्यांना दीपिका पादुकोणच्या लग्नाची बातमी ऐकायची आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता रणवीर सिंग साखरपुडा करणार असल्याची चर्चा वाºयासारखी पसरली होती. परंतु ही निव्वळ अफवा ठरली. मात्र आता आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत, जी वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही. होय, दीपिका नुकतीच बहीण अनिषासोबत नेहा धूपियाच्या टॉक शोमध्ये पोहोचली होती. ज्यामध्ये अनिषा बहीण दीपिकाच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या साखरपुड्याचे वास्तव सांगितले. 

या टॉक शोची होस्ट नेहाने दीपिकाला विचारले की, ‘तू इंगेज आहेस काय?’ यावर दीपिकाने स्पष्ट शब्दात नाही असे म्हटले. तसेच तिने तिचे दोन्ही हात वर करताना साखरपुड्याची अंगठी तुला दिसतेय काय असा प्रतिप्रश्न केला. मात्र दीपिकाचे वाक्य संपताच तिची बहीण अनिषाने सांगितले की, दीपिका गेल्या चार वर्षांपासून इंगेज आहे. यानंतर तिघीही हसायला लागल्या. मात्र यावेळी दीपिकाच्या बहिणीने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र अनिषाच्या या वक्तव्यानंतर दीपिका खरोखरच चार वर्षांपासून नातेसंबंधात आहे काय? यावर मात्र सध्या चर्चा रंगली आहे. 
 

असो, या टॉक शोमध्ये दीपिकाला इंडस्ट्रीतील बेस्ट किसर कोण असेही विचारण्यात आले. त्यावर दीपिकाने क्षणाचाही विलंब न करता रणवीर सिंगचे नाव घेतले. त्यामुळे दीपिका आणि रणवीर दोघांमधील नातेसंबंध जरी लपवित असले तरी, ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे यावरून स्पष्ट होते. आता ते  केव्हा लग्नाच्या बंधनात अडकतील याची मात्र त्यांच्या चाहत्यांना प्रतिक्षा लागली आहे. 

दरम्यान, या दोन्ही सुपरस्टाची प्रमुख भूमिका असलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट रिलीज झाला असून, त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रचंड वादाच्या भोवºयात सापडला असल्याने बॉक्स आॅफिसवर किती कोटी रुपयांचा गल्ला जमवेल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Deepika Padukone's sister reveals; Deepika's four years ago, watch the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.