पद्मावतीनंतर दीपिका पादुकोणाचा भाव वधारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 17:20 IST2017-07-08T10:20:28+5:302017-07-08T17:20:04+5:30
दीपिका पादुकोणचा पद्मावतीनंतर चांगलाच भाव वधारला आहे असे म्हटलं तरी वावगे ठरु नये. दीपिकाने आता एक चित्रपट काम करायला ...
.jpg)
पद्मावतीनंतर दीपिका पादुकोणाचा भाव वधारला
द पिका पादुकोणचा पद्मावतीनंतर चांगलाच भाव वधारला आहे असे म्हटलं तरी वावगे ठरु नये. दीपिकाने आता एक चित्रपट काम करायला 12 कोटी मानधन घेणार असल्याचे समजते आहे. एक वेबसाईटच्या माहितीनुसार दीपिकाच्या हातातून अनेक चांगले चित्रपट निसटले आहेत कारण तिने चित्रपटात काम करायला एका मोठी रक्कम मागितली. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिकाने राम-लीलामध्ये काम करण्यास 1 कोटींचे मानधन घेतले होते तर बाजीराव मस्तानीसाठी तिने 7 कोटी आकारले होते. आता ती 12 कोटी एका चित्रपटासाठी मानधन घेणार आहे आणि याच बरोबर ती बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारी पहिली अभिनेत्री बनली जिचे मानधन 10 कोटींच्यावर आहे. दीपिकाचे नाव फोर्ब्सच्या यादीत भारतातील अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सगळ्यात वर आहे. दीपिकाला नुकतेच ऑफर झालेल्या चित्रपटात दोन अभिनेंत्रीचा समावेश होता. दीपिकाने मागितलेली रक्कम ऐकून चित्रपटाच्या निर्मात्यांना धक्काच बसलाय. त्यामुळे त्यांनी दीपिकाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला चित्रपटात साईन केले. पद्मावतीनंतर दीपिका दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांच्या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर तिने एक ही चित्रपट साईन केलेला नाही. दीपिकाची वाढलेली रक्कम बघून किती दिग्दर्शक आणि निर्माते तिला चित्रपटात घ्यायची हिंमत करतील हे माहिती नाही. तसेच तिच्या वाढलेल्या मानधनाचा परिणाम तिच्या करिअर किती होतो हे लवकरच कळेल.‘पद्मावती’ चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिकेत दिसणार आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर असणार आहे. याव्यतिरिक्त रवल रतन सिंग यांच्या भूमिकेत शाहिद कपूर झळकणार आहे. 17 नोव्हेंबर 2017 रोजी हा पद्मावती रिलीज केला जाणार आहे.