रिलीज आधीच दीपिका पादुकोणच्या 'पद्मावत'चे कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 10:03 IST2018-01-13T04:33:28+5:302018-01-13T10:03:28+5:30

संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट पद्मावतला रिलीजच्या आधीच ग्रहण लागले आहे.  सेन्सॉर बोर्डाने रिलीजसाठी हिरवा कंदील दाखवल्या नंतरही ...

Deepika Padukone's 'Padmavat' crore loss in release already | रिलीज आधीच दीपिका पादुकोणच्या 'पद्मावत'चे कोटींचे नुकसान

रिलीज आधीच दीपिका पादुकोणच्या 'पद्मावत'चे कोटींचे नुकसान

जय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट पद्मावतला रिलीजच्या आधीच ग्रहण लागले आहे.  सेन्सॉर बोर्डाने रिलीजसाठी हिरवा कंदील दाखवल्या नंतरही चित्रपटाच्या मागे लागल्या अडचणी काही संपायचे नाव घेत नाहीत. सेन्सॉर बोर्डाने परवागनी दिल्यानंतरही करणी सेना चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करतायेत. करणी सेनेच्या विरोधाला बघता राजस्थान सरकराने हा चित्रपट त्यांच्या राज्यात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विरोध फक्त राजस्थान पुरता मर्यादित नाही आहे तर देशातल्या राज्यांमध्ये ही तिच परिस्थिती आहे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात सारख्या राज्यांमध्येही पद्मावतला जोरदार विरोध होतो आहे. त्यामुळे ज्या राज्यांमधील सरकारसुद्धा चित्रपटाला बॅन करण्याचा निर्णय घेऊ शकते. याच मुद्दयावर महाराष्ट्रदेखील मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार आहेत. 

ज्या राज्यांमध्ये पद्मावत बॅन केले जाण्याची शक्यता आहे त्याच्या राज्यांमधून चित्रपट जास्त गल्ला जमावतात. जर या राज्यांमध्ये चित्रपट रिलीज झाला नाही तर याचा थेट फटका संजय लीला भन्साळी यांना बसणार आहे. गोव्यात ही चिच परिस्थिती आहे. गोव्यात  कुठल्या संघटनेने नाही तर खुद्द गोवा पोलिसांनीच विरोध केला आहे. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून गोवा पोलिसांनी राज्य शासनाला एक पत्रही लिहिले आहे. पोलिसांनी पत्रात लिहिले की, ‘राज्यात ‘पद्मावत’ प्रदर्शित झाल्यास राज्यातील पोलीस यंत्रणेवर ताण वाढेल, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्याविषयी राज्य सरकारने विचार करावा.

भन्साळींना ‘पद्मावत’ बनवण्यास जवळपास दोन वर्षे लागलीत. पण  पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र हे सगळे आरोप संजय लीला भन्साळी यांनी फेटाळूण लावले आहेत. त्यांनी आधी ही अनेक वेळा करणी सेनेला हा चित्रपट एकदा पाहण्यास सांगितले होत. 

ALSO READ :  संजय लीला भन्साळींना अंक शास्त्राचा ‘आधार’! ‘पद्मावती’तील I गेला आणि आला अधिकचा A !

पद्मावत’मध्ये राणीची भूमिका दीपिका पादुकोणने साकरली आहे. शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे.  तर रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग प्रथमच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिद कपूरने सहा प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. 

Web Title: Deepika Padukone's 'Padmavat' crore loss in release already

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.