बघा बघा बाहुली न्यारी...!  दीपिका पादुकोणची ‘डॉल’ बाजारात आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 14:09 IST2020-03-06T14:07:00+5:302020-03-06T14:09:03+5:30

ही बाहुली पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.

deepika padukones padmaavat character gets a doll in traditional look-ram | बघा बघा बाहुली न्यारी...!  दीपिका पादुकोणची ‘डॉल’ बाजारात आली

बघा बघा बाहुली न्यारी...!  दीपिका पादुकोणची ‘डॉल’ बाजारात आली

ठळक मुद्देलवकरच दीपिका ‘83’ या सिनेमात पती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

बाजारात आलेला तैमूर बाहुला तुम्हाला आठवत असेलच. केरळच्या एका मार्केटमध्ये तैमूरच्या चेह-याचा बाहुला लोकप्रिय झाला होता. यानंतर तैमूरच्या नावाची बिस्किटे मार्केटमध्ये लोकप्रिय झाली होती. आता तैमूर पाठोपाठ बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोणची बाहुली बाजारात आली आहे. होय, ही बाहुली पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.

2017 साली दीपिकाचा ‘पद्मावत’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटात दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती. राणी पद्मावतीच्या रूपातील दीपिका सर्वांनाच भावल होती. तिच्या याच राजस्थानी लूकमधील बाहुली आता विक्रीसाठी बाजारात आली आहे.

 पद्मावतमधील दीपिकाचा लूक लक्षात घेत, ही बाहुली अतिशय बारकाईने डिझाईन करण्यात आली आहे. भांगेत कुंकू, गळ्यात राणी हार, हातात फुल, बांगड्या असाच लूक या बाहुलीला देण्यात आला आहे. बाहुलीच्या डोक्यावरही पदर आहे. या बाहुलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  ही नवीन बाहुली खेळणी तयार करणा-या कंपनीने बाजारात आणली आहे.


याआधी प्रेरणा आणि कोमोलिका यांच्या  बाहुल्यांनी बाजारात धूम केली होती. ‘कसोटी जिंदगी की 2’ या लोकप्रिय मालिकेत प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या बाजारात आल्या  होत्या. ‘कसोटी जिंदगी की 2’ची निमार्ती एकता कपूरने या बाहुल्यांचे फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले होते. याशिवाय प्रियंका चोप्रा आणि निक जोनास या सेलिब्रिटी जोडप्याची बाहुलीही बाजारात विक्रीस आली होती.


दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच तिचा ‘छपाक’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. लवकरच दीपिका ‘83’ या सिनेमात पती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

Web Title: deepika padukones padmaavat character gets a doll in traditional look-ram