Project Kमधला दीपिका पादुकोणचा नवा लूक रिलीज, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 08:45 IST2023-07-18T08:44:36+5:302023-07-18T08:45:06+5:30

Deepika Padukone's Project K : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. अभिनेत्रीचा हा लूक रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Deepika Padukone's new look release in Project K is going viral on social media | Project Kमधला दीपिका पादुकोणचा नवा लूक रिलीज, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Project Kमधला दीपिका पादुकोणचा नवा लूक रिलीज, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

२०२४चा बहुप्रतीक्षित चित्रपट 'प्रोजेक्ट के' (Project K) सध्या स्टार कास्टच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. पॅन इंडियाचा स्टार प्रभास आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण आणि प्रभास (Prabhas) यांचा आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के'चे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दीपिका पादुकोणने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत काम केले आहे. आता ती साऊथ स्टार प्रभाससोबत काम करताना दिसणार आहे. दीपिका ही अशीच एक स्टार आहे जी लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. दीपिका पादुकोण आणि प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'प्रोजेक्ट के'च्या टीमने या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यापूर्वी दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्टही शेअर करण्यात आली होती, मात्र त्या पोस्टरमध्ये अभिनेत्रीचा चेहरा दिसत नव्हता.

हे पोस्टर खूपच आकर्षक दिसत आहे, पोस्टरमध्ये दीपिकाचा चेहरा दिसत आहे. पोस्टर शेअर करत लिहिले आहे, 'चांगल्या भवितव्यासाठी एक आशा निर्माण झाली आहे'. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडतो आहे. दीपिका पादुकोणचा हा लूक पाहिल्यानंतर चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी आणखीनच उत्सुक झाले आहेत. २० जुलै (यूएसए) आणि २१ जुलै (भारत) 'प्रोजेक्ट के'ची पहिली झलक २० जुलैला यूएसए आणि २१ जुलैला भारतात दिसणार आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन नागा अश्विनने केले आहे.

Web Title: Deepika Padukone's new look release in Project K is going viral on social media