​दीपिका पादुकोणचे ‘घूमर’ नृत्य पाहून व्हाल दंग! ‘पद्मावती’चे पहिले गाणे रिलीज !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 15:29 IST2017-10-25T09:59:17+5:302017-10-25T15:29:17+5:30

अखेर ‘पद्मावती’चे पहिले गाणे ‘घूमर’ रिलीज झाले. बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा सगळ्यात वादग्रस्त आणि चर्चित चित्रपट ‘पद्मावती’कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Deepika Padukone's 'Ghoomar' dance will look at the dance! 'Padmavati' first song release !! | ​दीपिका पादुकोणचे ‘घूमर’ नृत्य पाहून व्हाल दंग! ‘पद्मावती’चे पहिले गाणे रिलीज !!

​दीपिका पादुकोणचे ‘घूमर’ नृत्य पाहून व्हाल दंग! ‘पद्मावती’चे पहिले गाणे रिलीज !!

ेर ‘पद्मावती’चे पहिले गाणे ‘घूमर’ रिलीज झाले. बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा सगळ्यात वादग्रस्त आणि चर्चित चित्रपट ‘पद्मावती’कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आधी या चित्रपटाचे पोस्टर आले आणि नंतरट्रेलर. आज या चित्रपटाचे पहिले गाणे सगळ्यांसमोर आले. हे अख्खे गाणे दीपिका पादुकोणवर चित्रीत करण्यात आले आहे आणि निश्चितपणे दीपिकाचा हा आत्तापर्यंतचा ‘मोस्ट चॅलेंजिंग’ डान्स आहे. या गाण्यासाठी दीपिकाला प्रचंड तयारी करावी लागली होती. तब्बल १४ किलोंचा घागरा आणि २० किलोंचे दागिणे घालून हा डान्स करणे सोपे नव्हते. पण दीपिकाने हे ‘शिवधनुष्य’ पेलले. त्यामुळेच ‘पद्मावती’तील या गाण्यासाठी दीपिकाची जितकी प्रशंसा करावी, तितकी कमी आहे. या गाण्यात दीपिका राजस्थानी लूकमध्ये दिसतेय. श्रेया घोषाल व स्वरूप खान यांनी गायलेल्या या गाण्याला स्वत: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे बोलही भन्साळी यांनीच लिहिले आहेत.



‘घूमर’ हा एक राजस्थानी नृत्य प्रकार आहे. या  प्रकारात राजस्थानी महिला एक गोल वर्तूळाकार फेर धरून नृत्य करतात. नववधू सासरी येते, तेव्हा तिचे स्वागत या नृत्याने केले जाते. राजस्थानात आजही सणवार, आनंदाच्या प्रसंगी हे नृत्य केले जाते.
या चित्रपटात दीपिका पादुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर शाहिद कपूर तिच्या पतीच्या अर्थात महारावल रतन सिंगची भूमिका साकारणार आहे. अभिनेता रणवीर सिंग याने या चित्रपटात सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारली आहे. 

ALSO READ: ‘पद्मावती’च्या घाग-यावर भारी पडेल हेमा मालिनींच्या ‘या’ घाग-याचा किस्सा! नक्की वाचा!!

अलीकडे जय राजपुताना संघ या राजपूत गटाने ‘पद्मावती’च्या मेकर्सला जाहिर धमकी दिली होती. रिलीज आधी ‘पद्मावती’ आम्हाला दाखवला गेला नाही आणि आमच्या संमतीविना तो रिलीज झालाच आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळलेच तर चित्रपटगृहे पेटवून देऊ, असे जय राजपुताना संघाने म्हटले होते. शूटींगच्या अगदी पहिल्या टप्प्यात करणी सेनेने ‘पद्मावती’च्या सेटवर धिंगाणा घातला होता. ‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत गत जानेवारीच्या अखेरिस करणी सेनेने राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे ‘पद्मावती’च्या सेटवर हल्ला केला होता. यादरम्यान ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाणही करण्यात आली होती. यानंतर ‘पद्मावती’चा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला होता. पण  काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटचीही तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला होता. 

Web Title: Deepika Padukone's 'Ghoomar' dance will look at the dance! 'Padmavati' first song release !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.