दीपिकाच्या निर्णयाने होणार बॉलिवूडप्रेमींची निराशा??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 16:58 IST2016-06-05T11:28:56+5:302016-06-05T16:58:56+5:30
होय!! ‘बाजीराव मस्तानी’नंतर दीपिका पदुकोणने थेट हॉलिवूडचा रस्ता धरला. आता हॉलीवूडपटानंतर दीपिका कुठला बॉलिवूडचा सिनेमा साईन करते, याकडे सर्वांचे ...

दीपिकाच्या निर्णयाने होणार बॉलिवूडप्रेमींची निराशा??
ह य!! ‘बाजीराव मस्तानी’नंतर दीपिका पदुकोणने थेट हॉलिवूडचा रस्ता धरला. आता हॉलीवूडपटानंतर दीपिका कुठला बॉलिवूडचा सिनेमा साईन करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, एक नवी बातमी समोर आली आहे. ही बातमी निश्चितपणे बॉलिवूडप्रेमींचे हृदय तोडणारी आहे. होय, दीपिकाने एक सिनेमा साईन केला आहे. मात्र तो हिंदी नव्हे तर तेलगू असल्याची खबर आहे. हॉलिवूडनंतर दीपिका तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार असल्याची बातमी आहे. एका आॅनलाईन पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, ‘Kattilantodu’ या चित्रपटाच्या मेकर्सची दीपिकासोबत बोलणी सुुरू आहे. हा चित्रपट अधिकृतरित्या विजय-मुरूगदासच्या ‘कथ्थीचा तेलगू रिमेक असणार. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे साऊथ स्टार चिरंजीवी यांची वापसी होणार आहे. चिरंजीवींचा हा १५० वा सिनेमा असेल. १५ वर्षांनंतर ते चित्रपटातून वापसी करणार आहेत. शेतकºयांच्या समस्यांभोवती या चित्रपटाची कथा गुंफलेली असेल. तूर्तास दीपिकाने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. तेव्हा बघू!